‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी PM मोदींना मिळणार ‘हा’ आंतरराष्ट्रीय अवॉर्ड, अमेरिका भेटीदरम्यान गौरव

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एकदा मोठा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या हेतूने देशात स्वच्छ भारत अभियान मोदींनी सुरु केले. याच योगदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची माहिती आज (सोमवार) पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.


या संदर्भात पंतप्रधान कार्य़ालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हणले आहे की, आणखी एक पुरस्कार, प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा आणखी एक क्षण, पंतप्रधान मोदी यांची मेहनत आणि प्रगतशील धोरणाची जगभरात प्रशंसा केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांना बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून गौरविण्यात येणार आहे. यापूर्वी सहा मुस्लिम राष्ट्रांनी आणि रशियाने मोदींचा गौरव केला होता.

बिल गेट्स यांच्याकडून मोदी सरकारच्या योजनाचे कौतुक
ऑक्टोबर 2018 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी स्वच्छ भार अभियानासाठी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशात आठ कोटी स्वच्छतागृहांची निर्मीती करण्यात आली आहे. या योजनेमुळे देशातील पाच लाख गावे हागणदारीमुक्त झाली असल्याचे सरकारची आकडेवारी सांगते.

आरोग्यविषयक वृत्त –