कोट्याधीशानं कॉन्फरन्समध्ये केलं ‘सेक्स टॉक’, महिलांबद्दल ‘वादग्रस्त’ विधान अन् गमावले 4200 कोटी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – एका अमेरिकी अरबपतीला बिग अ‍ॅप्पल इन्वेस्टमेंट काँफरन्समध्ये महिला आणि सेक्स संबंधित विधान करणं महागात पडलं आहे. 68 वर्षाय केन फिशर यांनी हे विवादास्पद विधान केल्याने त्यांना जवळपास 4200 कोटी रुपये गमवावे लागले. ते मागील आठवड्यात म्हणाले होते की एखाद्याला संपर्क साधने असे आहे की जसे बारमध्ये एखाद्या महिलेशी मैत्री झाल्यावर तिला लगेचच सेक्ससाठी परवानगी मागणे.

हे विधान समोर आल्यानंतर अमेरिकेच्या मिशिगन महसूल विभागने केन फिशरला स्टेट पेंशन सिस्टममधून बाहेर काढले. विभागाच्या मते ते आता त्यांच्याकडून 4200 कोटी रुपये परत घेत आहेत.

केन फिशर म्हणाले की पैसे आणि सेक्स, अनेक लोकांची खासगी बाब असते. फंडिंगसाठी नवे क्लाइंटला विचारणा करण्यासारखे आहे जसे बारमध्ये एखाद्या मुलीकडे जाणे.

केन फिशर बेस्ट सेलिंग ऑथर म्हणून ओळखले जातात. या आधी देखील ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मागील वर्षी त्यांनी एका काँफरन्समध्ये म्हणाले होते की त्यांनी कमी वयात जास्त सेक्स करायला हवे होते.

आता अरबपती केन फिशर यांना विधान केले की, काही मुद्दे समोर मांडण्यासाठी ज्या शब्दांचा वापर करण्यात आला तो पूर्णता चुकीचा आहे. मी असे करायला नको होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी