Birth of Twins | कशी जन्मतात जुळी मुले? जाणून घ्या गर्भात मेल-फिमेल बनण्याचे पूर्ण विज्ञान

नवी दिल्ली : जुळी मुले (Birth of Twins) दोन प्रकारची असतात आयडेंटिकल आणि नॉन-आयडेंटिकल. वैद्यकीय भाषेत यास मोनोजायगोटिक आणि डायजायगोटिक म्हटले जाते. सामान्यपणे महिलेच्या शरीरात एक अंडे असते जे एक स्पर्मसोबत मिळून एक भ्रूण (एम्ब्रियो) बनवते Birth of Twins. परंतु अनेकदा या फर्टिलायजेशनमध्ये एक नव्हे तर दोन मुले तयार होतात.

Birth of Twins | science behind the birth of twins know how male and female are developed

हे फर्टिलायजेशन एकाच अंड्यातून तयार झालेले असल्याने त्यांचे प्लेसेंटा सुद्धा एकच असते. या आवस्थेत एक तर दोन्ही मुले जन्माला येतात किंवा दोन्ही मुली. हे दिसायला जवळपास एकसारखेच असतात आणि त्यांचा डीएनएसुद्धा एकमेकांशी खुप मिळता-जुळता असतो. मात्र त्यांचे फिंगर प्रिंट्स वेगवेगळे असतात. अशाप्रकारच्या मुलांना मोनोजायगोटिक ट्विन्स म्हटले जाते.

SBI Alert | बँकेनं दिला सतर्कतेचा इशारा; आजच करून घ्या ‘हे’ काम, अन्यथा लागेल 10 हजार रुपये दंड

परंतु कधी-कधी असेही होते की, महिलेच्या शरीरात एकाच दोन अंडी तयार होतात जी फर्टिलाइज करण्यासाठी दोन स्पर्मची आवश्यकता भासते. यामध्ये दोन वेगवेगळे भ्रूण तयार होतात. या स्थितीत जन्माला येणार्‍या मुलांमध्ये आपआपला प्लेसेंटा असतो. यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा असू शकते. एकुणच हे दोन भाऊ-बहिण असतात ज्यांचा जन्म एकाचवेळी झालेला असतो. यास डायजायगोटिक म्हणतात.

हे कसे ठरते की भ्रूण मुलात किंवा मुलीत बदलणार

सामान्यपणे एखाद्या महिलेला एक महिन्यानंतर गरोदरपणाची जाणीव होते तोपर्यंत शरीरात भ्रूण तयार झालेले असते, ज्याचा आकार 6 मिलीमीटर म्हणजे मटरच्या दाण्यापेक्षा अर्धा असतो. यावेळी भ्रूणाची मान आणि हात-पाय तयार होण्यास सुरूवात होते.

Pune Khadakwasla Dam | पर्यटकांना खडकवासल्यापुढे जाण्यास बंदी, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

मात्र, यावेळेपर्यंत भ्रूणाचे लिंग ठरलेले नसते. हे 7व्या ते 12व्या आठवड्यात होते. या दरम्यान जर भ्रूणाचे X-X क्रोमोजोम्स डेव्हलप झाले तर मुलगी जन्माला येते. तसेच जर हे X-Y बनले तर मुलगा जन्माला येतो. मात्र हे इतके सोपे सुद्धा नसते. यामध्ये जीन्स आणि हार्मोन्सची मोठी भूमिका असते. विशेषता टेस्टोस्टेरॉन आणि एस्ट्राडियॉल नावाच्या हार्मोनची यामध्ये मोठी भूमिका असते.

सहाव्या ते सातव्या आठवड्यात भ्रूण सुमारे एक सेंटीमीटर एवढे मोठे होते. म्हणजे एकदम मटरच्या दाण्याएवढा. या दरम्यान सेक्स ग्लँड्स किंवा रिप्रॉडक्टिव्ह ग्लँड्सचा विकास झालेला असतो. मुलगा की मुलगी दोन्हीमध्ये हा ग्लँड सुरुवातीला एकदम एकसारखाच असतो. या ग्लँडद्वारे टेस्टीज बनू शकते जे टेस्टोस्टेरॉन नावाचे हार्मोन रिलिज करते. मुलांच्या लिंगाचा विकास याच कारणामुळे शक्य होऊ शकतो.

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 8,950 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

9 व्या आठवड्याच्या जवळपास लिंग तयार होण्यास सुरूवात होते. यावेळेपर्यंत यास अल्ट्रासाऊंडद्वारे पाहिले
जाऊ शकत नाही. असे सुद्धा होऊ शकते की, रिप्रॉडक्टिव्ह ग्लँड्स ओव्हरीजमध्ये बदलू शकते. अशवेळी
एस्ट्राडियॉल नावाचे हार्मोन रिलिज होऊ लागते. ज्या देशांमध्ये भ्रूणाच्या चाचणीची परवानगी आहे, तिथे
डॉक्टर 12व्या ते 14व्या आठवड्याच्या दरम्यान याबाबत काही सांगू शकतात.

12345 number note | सुवर्णसंधी ! तुमच्याकडे असेल 12345 नंबरची एखादी नोट तर कमावू शकता 1-5 लाख रुपयांपर्यंत, चेक करा डिटेल्स

यापूर्वी भ्रूणात लागोपाठ बदल होत असतात, ज्यामुळे ते मुलगा किंवा मुलगी सुद्धा बनू शकते. हे सर्व पूर्णपणे
हार्मोन आणि जीन्सच्या खेळावर अवलंबून आहे की अखेर मुलगा होणार किंवा मुलगी. जर ही प्रोसेस बरोबर
झाली नाही तर शक्य आहे की X-X क्रोमोजोम्स असूनही भ्रूणात मुलगा आणि मुलगी दोन्हीच्या गुणांचा
समावेश होऊ शकतो. त्यांना इंटरसेक्स म्हटले जाते.

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Birth of Twins | science behind the birth of twins know how male and female are developed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update