Birthday SPL : 47 व्या वर्षी बिकीनी घालून मंदिरा बेदीनं घातला होता ‘धुमाकूळ’, दाखवली होती ‘किल्लर’ फिगर !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी सोशल मीडियावर सुपरअॅक्टीव असते. आपल्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोंसाठी मंदिरा ओळखली जाते. सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोंमुळे मंदिरा अनेकदा चर्चेत आली आहे. आपली टोन्ड बॉडी फ्लाँट करायला तिला खूप आवडतं. मंदिरानं एकदा व्हॅकेशनवर असताना हॉट बिकीनी फोटो शेअर केले होते. तिचा हा हॉट अंदाज पाहून सर्वच हैराण झाले होते. कारण 47 वर्षीय मंदिरा तेव्हाही खूप हॉट आणि फिट दिसत होती.

मंदिरा तिच्या इंस्टाग्रामवरून हॉट बिकीनीतील फोटो शेअर करत असते. चाहते तिच्या फिगर आणि हॉटनेसचं कौतुक करत असतात. तिनं फोटो शअर करायचा उशीर असतो की, तिचे हजारो चाहते फोटोंवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडतात.

मंदिराचं वय 47 वर्षे आहे. मंदिरा आजही सुंदर, यंग आणि सेक्सी दिसते. स्वत:ला मंदिरानं खूप फिट ठेवलं आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती जीम, योगा आणि स्विमिंग असं सगळं करत असते. फिट राहण्यासाठी ती केवळ जीमवर अवलंबून नाही.मंदिराच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत तिनं लग्न केलं. तिला 8 वर्षांचा मुलगाही आहे.

मंदिराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच ती सुपरस्टार प्रभासच्या साहो या सिनेमात झळकली होती. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, इत्तेफाक, शादी का लड्डू, दस कहानिया, वोडका डायरीज अशा अनेक सिनेमात मंदिरानं भूमिका साकारली आहे. मंदिरानं शांति या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मंदिरानं अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. सीआईडी, क्युंकी सास भी कभी बहू थी अशा तिनं काम केलेल्या काही मालिका सांगता येतील.