खुशखबर ! वीज बिल दूप्पट आलंय तर मग ‘नो-टेन्शन’, आता रक्कम EMI वर भरा, ‘या’ प्राधिकरणानं सुरू केली सुविधा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   बेस्ट अंडरटेकिंगने आपल्या ग्राहकांना विजेची बिले भरण्यासाठी तीन महिन्यांची ईएमआय सुविधा दिली आहे. प्राधिकरणाने निवेदन जारी करुन ही माहिती दिली आहे. दरम्यान, असे म्हटले आहे की, ही सुविधा फक्त अशा खात्यांसाठी आहे ज्यांची बिले सरासरी तीन महिन्यांच्या (मार्च ते मे) दुप्पट आहेत. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमांनी आपल्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना तीन महिन्यांच्या स्थगितीची सुविधा निश्चित फीवर दिली आहे. बेस्ट अंडरटेकिंग मुंबईत वीजपुरवठा करतो आणि कंपनीच्या ग्राहकांची संख्या सुमारे 10 लाख आहे.

कंपनीने म्हटले आहे की, “ज्या ग्राहकांचे वीज बिल मार्च ते मे या कालावधीत सरासरीपेक्षा दुप्पट आहे, ते कॅरिंग कॉस्टसह तीन हप्त्यांत पैसे भरू शकतात. ” बेस्टसह महाराष्ट्रात इतर वीज पुरवठा कंपन्या, महावितरण, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई आणि टाटा पॉवर यांना जूनमध्ये वाढलेल्या वीज बिलावर टीकेचा सामना करावा लागला आहे.

बेस्टने स्पष्टीकरण दिले की, लॉकडाऊन कालावधी दरम्यान तयार केलेली बिले मार्चमधील वापरावर आधारित आहेत. प्राधिकरणाचे निवासी ग्राहक अंदाजे 7.6 लाख असून औद्योगिक ग्राहकांची संख्या 8,836 आहे. बेस्टने नमूद केले आहे की, “एप्रिल, मे आणि जून महिन्यात सामान्यतः वापर वाढतो. लॉकडाऊन दरम्यान लोक घरात होते आणि बर्‍याच प्रकरणांमध्ये घरगुती वापरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ”