Asia’s Richest Man : आता मुकेश अंबानी नाही राहिले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, चीनच्या ‘या’ टॉपच्या व्यावसायिकानं पाडलं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोमवारी भारतीय शेअर बाजारात घसरणं झाल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरणं झाली. आरआयएलचे बाजारी भांडवल कमी झाल्याने मुकेश अंबानी यांनी डोक्यावर असलेल्या अशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुखूट अलीबाबाचे संस्थापक जॅक मा कडे गेला. ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्समध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये आता जॅक मा यांचा क्रमांक लागला आहे. 11 मार्चला आलेल्या बिलिनियर इंडेक्सनुसार जॅक मा 18 व्या क्रमांकावर तर मुकेश अंबानी 19 व्या क्रमांकावर आहेत.

या इंडेक्सनुसार जॅक मा यांची एकूण संपत्ती 45.7 अब्ज डॉलर आहे तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 42.3 अर्ज डॉलर आहे. जगभरातील श्रीमंताच्या यादीत अ‍ॅमेझॉनचे जेफ बेजोस हे प्रथम स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 117 अरब डॉलर आहे.

या इंडेक्सनुसार, या वर्षी आतापर्यंत मुकेश अंबानीच्या नेटवर्थमध्ये 16.3 अब्ज डॉलरची घसरणं पाहायला मिळाली. तर 9 मार्चच्या तुलनेत 11 मार्चला नेटवर्थमध्ये 467 मिलियन डॉलरची वाढ झाली आहे. बुधवारी RIL च्या शेअरमध्ये तेजी आल्याचे पाहायला मिळाले. 9 मार्चला जेव्हा देशांतर्गत शेअर बाजारात विक्रमी घसरणं झाली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजचा भांडवली बाजार 10 लाख कोटी रुपयांवरुन 7 लाख कोटी रुपये झाला होता.