Stock Market Close : बँकिंग, फायनान्स, आयटी कंपन्यांचे ‘शेअर्स’ पडले, घसरणीसह बंद झाले Sensex, Nifty

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जागतिक पातळीवर संमिश्र ट्रेंडच्या दरम्यान स्थानिक शेअर बाजारात गेल्या चार सत्रांपासून सुरू असलेला तेजीचा क्रम गुरुवारी थांबला. बँकिंग, फायनान्स, आयटी आणि फार्मा कंपन्यांचे शेअर्स घसरल्यामुळे BSE Sensex 148.82 अंक म्हणजेच 0.37 टक्क्यांनी घसरून 40558.49 अंकांवर बंद झाला. याच्या मागील सत्रात Sensex 40,707.31 अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे NSE Nifty 41.20 अंक म्हणजेच 0.35 टक्क्यांनी घसरून 11896.50 अंकांवर बंद झाला. सेक्टरविषयी बघितले तर फार्मा, आयटी आणि बँकांशी संबंधित सेक्टरल इंडेक्स लाल निशाणासह बंद झाले. दुसरीकडे धातू, ऊर्जा आणि इन्फ्रा क्षेत्रांत खरेदी दिसून आली.

सेन्सेक्सवर इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वात जास्त 3.10 टक्क्यांनी घसरण दिसून आली आहे. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टायटन, एचडीएफसी बँक आणि नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्येही 1.76 टक्क्यांची घसरण दिसून आली. याशिवाय मारुती, टेक महिंद्रा, सन फार्मा, रिलायन्स, एशियन पेंट, बजाज ऑटो, बजाज फिनझर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस आणि एचडीएफसी यांचे शेअर्सही लाल निशाणासह बंद झाले.

दुसरीकडे एनटीपीसीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.10 टक्के वाढ झाली. भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये देखील 2.77 टक्क्यांची वाढ दिसून आली. याशिवाय बजाज फायनान्स, अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, ओएनजीसी, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, पॉवरग्रीड, आयटीसी आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

आनंद राठी येथील मुख्य-इक्विटी संशोधन (फंडामेंटल) नरेंद्र सोळंकी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आशिया-पॅसिफिक क्षेत्राच्या विकास दर संबंधित अनुमानास (-) 2.2 टक्क्यांपर्यंत खाली आणल्यानंतर आशियाई आणि जागतिक बाजारपेठांमध्ये नरमाईचा कल दिसून आला आणि भारतीय बाजारात घट पाहण्यास मिळाली. जागतिक बाजारपेठेविषयी बघितले तर शांघाय, टोकियो आणि सीओल येथे बाजारपेठा घसरून बंद झाल्या. त्याच वेळी, हाँगकाँगमध्ये बाजारपेठा वाढीसह बंद झाल्या. युरोपियन बाजारांमध्ये सुरुवातीच्या व्यवसायांमध्ये तेजी दिसून येत आहे.

You might also like