BJP Chandrashekhar Bawankule | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळेंच्या विधानाने शिंदे गटातील खा. प्रतापराव जाधव यांची धाकधूक वाढली

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Chandrashekhar Bawankule | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात भारताचा विश्वगुरु बनण्याचा प्रवास सुरू असून त्यांचे व्हिजन भारताला जागतिक उंचीवर नेणार आहे. नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी 2024 च्या निवडणुकीत बुलढाण्याचा खासदार भाजपाच्या कमळ चिन्हावरचा द्यावा लागेल, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे (BJP Chandrashekhar Bawankule) यांनी केल्याने शिवसेनेतील (Shivsena) बंडखोर आणि शिंदे गटातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांची धाकधूक वाढली आहे. जाधवांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

 

भाजपाने आतापासूनच 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections 2024) हालचाली सुरू केल्या असून महाराष्ट्रातील महत्वाच्या मतदारसंघांसाठी दिल्लीतील नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

 

याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrashekhar Bawankule) पक्षसंघटना मजबुत करण्यावर भर देत आहेत.
बावनकुळे बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana District) आले असताना शहर भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली.
या बैठकीत बावनकुळे यांनी केलेल्या वरील विधानाने शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार प्रतापराव जाधव याची धाकधुक वाढली आहे.

 

बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.
2024 लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे आपण उमेदवार असणार असे
जाधव यांना वाटत असतानाच बावनकुळे यांच्या वक्तव्याने त्यांची चिंता वाढवली आहे.

 

Web Title :- BJP Chandrashekhar Bawankule | buldhana next mp will be from bjp state president chandrashekhar bawankules statement shinde mp prataprao jadhavs tension increased

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Healthy Fats | डायबिटीजमध्ये लाभदायक आहे ऑलिव्ह ऑईल, जाणून घ्या इतर हेल्दी फॅट्सचे लाभ

 

Tulsi che Fayde | ‘या’ 5 आजारांच्या उपचारात अतिशय प्रभावी आहेत तुळशीची पाने, शरीर बनवतात निरोगी

 

Weight Loss Drink | ‘या’ 2 वस्तू मिसळून बनवा स्पेशल हेल्दी ड्रिंक; वजन कमी करणे होईल अतिशय सोपे