‘सॉरी’, मला ‘पुतळा’ म्हणायचं होतं : भाजपा कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा

नवी दिल्ली – भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा यांची भर कार्यक्रमात, तेही गुजरातमध्येच जीभ घसरली. एका कार्यक्रमात बोलताना नड्डा यांनी नरेंद्र मोदींची कल्पना बघा, त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील सर्वात उंच इमारत बांधली असे विधान केले आणि चूक लक्षात येताच ‘ सॉरी’ म्हणण्याची वेळही त्यांच्यावर ओढावली.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. नर्मदा जिल्ह्यातील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. याठिकाणी कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना नड्डा म्हणाले, आदरणीय मोदींची कल्पना बघा. त्यांनी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील सर्वात उंच इमारत बांधली आहे. नड्डांना ही चूक लक्षात येताच त्यांनी सॉरी म्हणत जगातील सर्वात उंच पुतळा म्हणत भाषण सुरू ठेवले. सगळ्यात उंच पुतळा ही मोदींची कल्पना आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी याचा विचार केला होता. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी हा विचार प्रत्यक्षात करुन दाखवला.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like