‘JNU मध्ये जाण्यापेक्षा दीपिकानं मुंबईत जाऊन नाचावं’, भाजपच्या ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी JNU च्या विद्यार्थांची भेट घेतली त्यामुळे नवे राजकीय युद्ध सुरू झाले आहे. तिने जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये दीपिकाने सहभाग घेतला होता. यावरून काही भाजप कार्यकर्त्यांनी तिच्या छपाक चित्रपटावर बहिष्कार टाकला होता. तर सोशल मीडियावरून तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

यावर भाजपचे नेते गोपाल भार्गव यांनी दीपिका पादुकोण बाबत वादग्रस्त वक्तव्य केला आहे की, अभिनेत्रीने मुंबईतच राहावे आणि नाचावे. दीपिकाच्या जेएनयू भेटीवरून सध्या राजकारण तापले आहे. भार्गव म्हणाले की, ‘मुंबईमध्ये थांबून अभिनेत्रीने केवळ डान्स केला पाहिजे. तिला जेएनयूमध्ये जाण्याची काय गरज होती हेच मला कळलं नाही. स्वत: ला कलाकार आणि कार्यकर्ते म्हणवणारे अनेक लोक तयार झाले आहेत’ दीपिकाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती.

त्यामुळे दीपिका ट्रोलर्सच्या निशान्यावर आली होती. एवढच नाही तर सोशल मीडियावर #BoycottChhapaak अशी मोहीम दीपिकाविरुद्ध राबविण्यात आली होती. जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेचं समर्थन करणाऱ्या लोकांनी दीपिकाला देशद्रोही ठरवण्यास सुरुवात केली होती. तसेच लोकांनी तिचा आगामी छपाक चित्रपट पाहू नये, असं आवाहन करण्यात येत होतं. दीपिकाला धडा शिकवण्यासाठी तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाका, असं आवाहन करण्यात आले होते. अनेक युजर्सने दीपिकाला देशविरोधी म्हणत अनफॉलो केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/