BJP खासदारांचा ‘वर्ग’ चालू असताना PM नरेंद्र मोदी ‘चक्क’ पाठीमागे जाऊन बसले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा असो कि राज्यसभा अथवा भाजपाची संसदीय दलाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच पहिल्या रांगेत बसलेले दिसून येतात. पण शनिवारी एक अजब नजारा पहायला मिळाला. दिल्लीत सुरु असलेल्या खासदारांच्या शिबीरात मोदी मागच्या रांगेत बसून खासदारांच्या समवेत बसलेले दिसून आले.

भाजपाच्या खासदारांसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण कार्यक्रम सध्या दिल्लीत सुरु आहे. या प्रशिक्षण कार्यकमाला त्यांनी अभ्यास वर्ग असे नाव दिले असून त्याला उपस्थित राहणे आवश्यक करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा, सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह हे नेते मार्गदर्शन करणार होते. संसदेच्या ग्रंथालयाच्या इमारतीत हा कार्यक्रम सुरु आहे.

शनिवारी या कार्यक्रमाला खासदार पोहचले तर त्यांना खूप आश्चर्य वाटले. पंतप्रधान इतर सामान्य खासदारांसारखे मागच्या रांगेत बसलेले दिसून आले. त्यांच्या मागच्या बाजूला काही महिला खासदार बसल्या होत्या तर, त्यांच्या पुढील रांगेत दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी बसलेले दिसून येत होते. वक्ते काय बोलत आहेत, हे मोदी ऐकत बसले होते.

या बैठकीत सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधींचे आचरण व वागणुक कशी असावी, याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. आज रविवारी सांयकाळी समारोप समारंभात पंतप्रधान मोदी खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

मोदी यांचा मागच्या बाजूला बसलेला फोटो ट्विट करुन मनोज तिवारी यांनी म्हटले आहे की, ‘कोई यूँ हीं जन जन का प्यारा नहीं हो जाता, कोई ऐसे ही पूरी दुनिया में नहीं छा जाता, कोई यूँ हीं नरेंद्र मोदी नहीं बन जाता, आम सांसद की तरह पीछे जाकर बैठने का हृदय होना चाहिये’.

आरोग्यविषयक वृत्त –