हिंदूंना विरोध करणार्‍यांना पाकिस्तानात पाठवू : भाजप प्रवक्ते गोपालकृष्णन

नवी दिल्ली –  वृत्तसंस्था : भाजपाचे प्रवक्ते बी. गोपालकृष्णन यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे ते म्हणाले, ‘नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देणाऱ्या आखाती देशांमध्ये राहणाऱ्या हिंदूंना काही लोक धमकावत असून, अशा धमकावणाऱ्या लोकांना पाकिस्तानात पाठवले जाईल’. ते म्हणाले की इंडियन यूनियन मुस्लीम लीगने जातीयवादी तत्वांना हटवले आहे. आखाती देशात राहणाऱ्या या हिंदूना जो कुणी धमकावणार त्याला आम्ही पाकिस्तानात जाण्यास भाग पाडू असे ते म्हणाले.

बी. गोपालकृष्णन म्हणाले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एक व्हिडिओत केरळमधील काही लोकांच्या जमावाने बहरीनमधील एका हॉटेलमध्ये नागरिकत्व कायद्याचे समर्थन केले. बहरीन मधील हे हॉटेल एका हिंदू मालकाचे असून या हॉटेलमध्ये ही निदर्शने करण्यात आली होती. या हॉटेलच्या मालकाने नागरिकता कायद्याचे समर्थन केले होते. ते त्रिशूर येथील रहिवासी आहेत.

तसेच गोपाळकृष्णन यांनी धमकीही दिली की केरळ सरकारने जर एनपीआरची प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न केला तर केरळ राज्यातील राशन बंद करण्यात येईल. केरळमधील एलडीएफ सरकारने राज्यातील राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) यादी अद्ययावत करण्याबाबतची प्रक्रिया रोखली आहे, त्यासंदर्भात ते म्हणाले की, एनपीआर प्रक्रिया ही मुख्यमंत्री पी. विजयन सरकारने लागू करावी. जर तसे झाले नाही तर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत देण्यात येणारे राशन बंद करण्यात येईल असा इशारा त्यांनी केरळ सरकारला दिला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/