Coronavirus : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांनी याबाबत स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनच्या प्रत्येक दिवशी आपण कार्यरत होतो. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परेश्वराची इच्छा असावी असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

 

देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला आयसोलेट केलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते औषधोपचार घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बिहारच्या निवडणुकीची मोठी जाबबदारी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं सोपवलेली आहे. आता फडणवीसांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना विश्रांती घेणं गरजेचं आहे.

You might also like