पंकजा मुंडेंची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंकजा मुंडेंची भाजप बद्दलची नाराजी सर्वांसमोर आल्यानंतर आज भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेची आज भेट घेतली. परंतू ही भेट कौटुंबिक भेट असल्याचे भेटीनंतर खडसेंनी सांगितले. पंकजाताई आणि रोहिणी खडसेंच्या पराभवाची नक्की कारणे काय यावर चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

आगामी काळात पराभव झाल्यास कोणत्या कारणाने पराभव झाला याची कारणं वरिष्ठांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि वरिष्ठांनी याची नोंद घेऊन पक्षांविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशी आशयाची ही चर्चा होती. परंतू आमच्यात कोणीही नाराज नसल्याचे हे खडसेंनी यावेळी सांगितले. प्रदेशाध्यक्षांकडे पक्षाविरोधात काम करणाऱ्यांची नावे दिली आहेत त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे असे मत खडसेंनी व्यक्त केले.

माझं आणि पंकजांचे एकच मत असल्याचे त्यांनी सांगितले, दुर्दैवाने हे चित्र खरे आहे की ओबीसी-बहुजन नेते आहेत त्या ठिकाणी हरले. रोहिणी खडसे, पंकजा मुंडे याचा पराभव झाला तर प्रकाश मेहता, विनोद तावडे, बावनकुळे यांनी तिकिट नाकरण्यात आले तर काही ठिकाणी पाडण्यासाठी प्रयत्न झाले.

खडसे म्हणाले की निवडणूक व्यवस्थित लढवली गेली असती तर भाजपच्या 105 पेक्षा अधिक जागा निवडून आल्या असत्या. महायुतीला जनतेने मतदान केले होते प्रमुख दोन घटक म्हणजे भाजप आणि शिवसेना दोघांच्याही ठिकाणी समन्वय व्यवस्थित झाला असता दोन पावले मागे गेले असते तर महायुतीचाच मुख्यमंत्री झाला असता. सेनेची एखादी मागणी मान्य केली असती तरी मार्ग निघाला असता, माझा रोख मुख्यमंत्र्यांवर असण्यापेक्षा जो प्रमुख आहे त्यांच्यावर आहे.

खडसे पुढे म्हणाले, पक्ष कधीच या संदर्भात दोषी नसतो, नेतृत्व यशात भागीदार होतं तर अपयशात देखील भागीदार व्हायला हवं. पक्ष म्हणून नाही तर ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केले त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारला हवी. यावेळी खडसेंनी विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील शुभेच्छा दिल्या.

Visit : policenama.com