HM अमित शहा बरे होईपर्यंत ठेवणार रोजा, मुस्लीम नेत्याची प्रार्थना

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाची बाधा झाल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपच्या कार्यकत्यांनी त्यांची तब्येत लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करीत आहे.

जम्मू आणि काश्मिरचे भारतीय जनता पक्षाचे नेते गुफ्तार अहमद यांनीदेखील अमित शहा यांच्यासाठी रोजा ठेवण्याचा निर्धार केला आहे. शहा यांची तब्येत पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत आपण रोजा ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुफ्तार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आजपासून दररोज रोजा ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अमित शहांना लवकर बरे वाटावे यासाठी आपण अल्लाहतालाकडे प्रार्थना करणार आहे. शहा यांनी काल ट्विट करुन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यावेळी ट्विटमध्ये त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन आणि चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. शहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर मंत्रिमंडळात धावाधाव सुरू झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like