पंकजा मुंडेंचा पुन्हा एकदा राज्यातील नेतृत्वावर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामविकास मंत्री म्हणून काम करताना अनेक अडथळे आले असे सांगतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ते खाते आव्हानात्मक होते. मात्र साधी आमदार असतानाही मी जनहिताची अनेक कामे केलेली आहेत. जलयुक्त शिवार योजना मी खूपच आधीच राबवली होती, असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावला. साधी आमदार असतानाच मी जलयुक्त शिवार योजनेची कामे केली. त्यानंतर सरकारमध्ये गेल्यावर देखील त्या योजनेवर काम सुरु ठेवले असे ही त्यांनी सांगितले.

जलसंधारणाचे काम करताना गुजरात पॅटर्न राबवल्याचे ही पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांनी पक्षावर नाराज नाही पुन्हा एकदा बोलून दाखवले. गुजरात पॅटर्न राबवल्याचा बराच फायदा झाला. परंतू अनेकदा प्रसिद्धीचे नकारात्मक परिणाम देखील सहन करावे लागतात. मला पण याचा अनुभव आहे. पक्षावर नाराज नसल्याचे देखील त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

मी फेसबूकवरील पोस्ट लिहिली त्यामागे कोणतीही अस्वस्थता होती. मी नाराज नव्हते, अस्वस्थ नव्हते. परंतू 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान ज्या वावड्या उठल्या त्यामुळे मी अस्वस्थ झाल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

मला विरोधी पक्ष नेते पद हवं आहे म्हणून मी पॉवर गेम खेळत असल्याचा वावड्या उठवल्या जात होत्या. त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मी कोअर कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. व्यक्त होणं आणि पक्षविरोधी असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या अस्वस्थतेची कारणं वेगळी आहेत. माझ्यावर अन्याय झाल्याचं मी कधीही म्हणले नाही. निवडणूकीतील पराभव स्वीकारुन मी पुन्हा एकदा शून्यातून कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगत त्यांनी आपली पुढील वाटचाल काय असणार हे स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/