देवेंद्र फडणवीसांना ‘ट्रोल’ करणार्‍यांना आवरा, BJP ची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केले जात आहे. ट्रोल करणार्‍यांना रोखले जावे अशी मागणी भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली आहे. ज्या पद्धतीने सोशल मीडियावर बदनामी कारक पोस्ट टाकून देवेंद्र फडणवीस, भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिली जात आहे, अश्लील पद्धतीने ट्रोलिंग व सोशल मीडियावर गैरसमज पसरविणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा शिष्टमंडळांने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मंगलप्रभात लोढा परमबीर सिंह यांच्या भेटीला गेले होते. भाजपा नेत्यांनी यावेशी पोलिसावंर होणारे हल्ले चिंताजनक असून हल्लेखोरांवरही कठोर कारवाई केली जावी असे मागणी केली आहे.

राज्यपालांच्या टोपीवर वक्तव्य केल्यानंतरही जर गुन्हा दाखल होत नसेल तर हे गंभीर असून पोलीस दुजाभाव करत असल्याचा आरोप आहे. आक्षेपार्ह पोस्ट नसतानाही आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले जात असून हे सरकार सुडाचे राजकारण करते काय का अशी शंका निर्माण होत आहे.

काही ठिकाणी अश्लील पोस्ट टाकल्यानंतर त्याला दम देणे अपेक्षित आहे का ? भाजपाची सहनशीलता दुर्बलता समजू नये. अन्यथा आमचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील हेही आम्ही नम्रपणे सांगितले असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.