अशोक चव्हाण भाजपवर कडाडले, म्हणाले – ‘भाजप नेत्यांनी किमान पदाची प्रतिष्ठा ठेवावी’

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षण प्रकरणातील ॲटर्नी जनरल यांची विधाने माझ्या तोंडी घालून भाजप नेते महाराष्ट्राची फसवणूक करीत आहेत. किमान संवैधानिक पदावर बसलेल्या भाजप नेत्यांनी तरी असले उद्योग करू नयेत. सत्ताकारणासाठी संवैधानिक पदांची प्रतिष्ठा पणाला लावणे योग्य नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, अशोक चव्हाण यांनी १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे राज्यांचे अधिकार बाधित झाल्याचे विधान करत असा आरोप त्यांनी केला. यावरून अशोक चव्हाण यांनी दरेकर यांचे हे आरोप फेटाळून लावले. १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे राज्यांच्या अधिकारांवर बाधा येते, अशी भूमिका ॲटर्नी जनरल यांनी ८ मार्च रोजी सुप्रीम कोर्टात मांडले होते. आणि त्याचीच मुद्देसूद माहिती मी विधिमंडळात दिली. परंतु मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त झाल्याने अखेर केंद्र सरकार झुकले व त्यांनी आपली भूमिका बदलली. असे अशोक चव्हाण म्हणाले.

तसेच पुढे चव्हाण म्हणाले की, १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे राज्यांचे अधिकार बाधित होत नाहीत, अशी सुधारित भूमिका काल ॲटर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टात मांडल्याने. या नवीन भूमिकेचे मी स्वागत करतो आहे. असेही अशोक चव्हाण यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केलं आहे.