BJP Maharashtra | ‘सामना’च्या अग्रलेखात विकिपीडियाचा मजकूर? भाजपने सादर केला पुरावा; म्हणाले- ‘सामनाच्या संपादकाची हुश्शारी..!, किमान…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक होते असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. तर भाजप आणि शिंदे गटाने (Shinde Group) अजित पवारांच्या विरोधात आंदोलन केलं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामानामध्ये (Samana) ‘छत्रपती संभाजीराजे स्वराजरक्षक की धर्मवीर? अण्णाजी पंतांचे तारतम्य!’असा अग्रलेख लिहिला आहे. परंतु हा अग्रलेख विकिपीडियावरुन (Wikipedia) कॉपी केल्याचा आरोप भाजपने (BJP Maharashtra) केला आहे. तसेच हीच का ती रश्मी ठाकरेंच्या (Rashmi Thackeray) सामनाच्या संपादकाची हुश्शारी! असा टोला संजय राऊतांना (Sanjay Raut) भाजपने (BJP Maharashtra) लगावला आहे.

 

भाजप महाराष्ट्रच्या (BJP Maharashtra) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत पुरवा दाखवण्यात आला आहे. ट्विटमध्ये म्हटलं की, ‘वा रे सर्वज्ञानी संजय राऊत कार्यकारी संपादक साहेब! चक्क विकिपीडियावरील मजकुराची कॉपी करुन अग्रलेखात वापरावी लागणे, हीच का ती रश्मी ठाकरे यांच्या सामनाच्या संपादकाची हुश्शारी..! दुसऱ्यांना आत्मपरिषक्षणाचे धडे देणाऱ्यांनी किमान स्व ज्ञानात भर घालावी’, असा टोमणा भाजपने लगावला आहे.

 

मजकूरात काय लिहिलं आहे?
बुधवारी (दि.3) छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक की धर्मवीर? अण्णाजी पंतांचे तारतम्य! या प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं की, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. तरुण, स्वाभिमानी संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. अमात्य अण्णाजी पंत दत्तोंच्या कारभारास संभाजी महाराजांचा विरोध होता. असं अग्रलेखात लिहण्यात आले असून हा मजकूर विकिपीडियावरुन कॉपी केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

 

Web Title :- BJP Maharashtra | bjp maharashtra tweet shivsena mouthpiece saamana editorial photo say copied text wikipedia tant sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahavitaran Strike | राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगार संघटनांची सरकारसोबत सकारात्मक चर्चा (व्हिडिओ)

Ajit Pawar on Nitesh Rane | टिल्ल्या लोकांनी मला शिकवू नये; अजित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा

IPS Deven Bharti | वरीष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बृहन्मुंबईच्या विशेष आयुक्तपदी नियुक्ती