Maharashtra Political News | ‘जे जे घडतंय ते बघत राहायचं, पण काँग्रेस पक्ष फुटणार नाही’ काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा दावा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशी परिस्थिती आली आहे की दोन प्रमुख पक्ष फुटले आहेत. शिवसेना (Shivsena) मागच्या वर्षी आणि राष्ट्रवादी (NCP) या वर्षी. त्यानंतर आता काँग्रेस (Congress) पक्षही फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी काँग्रेसमधील काही लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. तसेच आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनीही असेच वक्तव्य (Maharashtra Political News) केलं होतं. या चर्चा सुरु असताना माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Former CM Sushilkumar Shinde) यांना याबाबत विचारले असता त्यावर त्यांनी सूचक उत्तर दिलं.

 

मला असं मुळीच वाटत नाही की काँग्रेस पक्ष फुटेल. काँग्रेस पक्ष हा विचारांनी पक्का आहे. एकदा काँग्रेस पक्ष फुटला ही वस्तुस्थिती होती. पण यापुढे असं होईल असं वाटत नाही, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले. ते सोलापूरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

जे जे होतंय ते पाहायचं

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, राज्याच्या राजकारणात (Maharashtra Political News) जे घडलंय त्याच्यावर आता प्रतिक्रिया देणे योग्य नाही. आता फक्त जे जे घडतंय ते फक्त बघत राहायचं. ज्या पद्धतीने दोन-दोन उपमुख्यमंत्री झालेत, ती नवी प्रथा आता महाराष्ट्रात सुरु झाली का काय असेच वाटत आहे असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटली मात्र काँग्रेस पक्ष कधीच फुटणार नसल्याचा दावा शिंदे यांनी केला.

 

निरीक्षण करणे गरजेचे आहे

राज्यात तीन पक्षाचे सरकार आले आहे, यासंदर्भात विचारले असता शिंदे म्हणाले,
आता ते बघायचं आहे. कशा पद्धतीने सरकार चालवितात. राष्ट्रवादी एकदा फुटलेली आहे,
आता त्यांना ओढून परत आणता येणार नाही. त्यामुळे आता निरीक्षण करणे गरजेचे आहे.
निवडणुका येत आहेत.
सर्वसामान्य जनताच आता त्यांना धडा शिकवेल याविषयी माझ्या मनात शंका नसल्याचेही शिंदे म्हणाले.
नव्या परिस्थितीत जे जे होतंय ते पाहायचं आहे. नव्या राजकारणांवर सर्वसामान्य लोक चिडले आहेत, याचा नक्कीच परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

 

 

Web Title : Maharashtra Political News | keep watching what is happeningcongress party will never split sushilkumar shindes claim

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा