भाजप नगराध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत : माजी मंत्री पाचपुतेंना मोठा धक्का

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – श्रीगोंदा नगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाचे विद्यमान नगराध्यक्ष मंत्री बबनराव पाचपुते यांचे कट्टर समर्थक मनोहर पोटे यांनी आज सकाळी ऐनवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रवेश केल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या पत्नी 27 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार असतील. तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनीही आघाडीत प्रवेश केला आहे, असे आमदार राहुल जगताप व काँग्रेस जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना पोटे यांचा प्रवेश मोठा धक्का मानला जात आहे. सध्या पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची सत्ता आहे, पोटे हे विद्यमान नगराध्यक्ष आहेत.  त्यांच्या पत्नी भाजपाच्या भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार होत्या. मात्र सोमवारी त्यांना मोठा धक्का देण्यात आला. आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन पोटे यांच्या पत्नी शुभांगी या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडुन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे. त्यांच्यासोबतच अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनीही भाजपला रामराम ठोकून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी प्रवेश केला आहे. त्यांचे सुपुत्र गणेश भोस हे निवडणुकीत आघाडीचे उमेदवार असतील.
27 जानेवारी रोजी श्रीगोंदा नगरपालिकेसाठी मतदान होत आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते हे अनेक महिन्यांपासून श्रीगोंदा तळ ठोकून आहेत. श्रीगोंदा नगरपालिकेत पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. असे असताना त्यांचे कट्टर समर्थक नगराध्यक्ष पोटे बाबासाहेब भाऊ नगरसेवक सतीश मखरे यांनी आजा गाडीत प्रवेश केला.