‘राहुल गांधी वेडे’; त्यांना मनोरूग्णालयात पाठवा

दिल्ली : वृत्तसंस्था

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना भाजपाच्या मंत्र्याची जीभ घसरली त्यांनी राहुल गांधी वेडे, त्यांना मनोरूग्णालयात पाठवा’ असे बेताल वक्तव्य केलं आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’368e3baa-adca-11e8-971b-ad0570eee732′]

काही दिवसापासून भाजपाचे काही नेते बेताल व्यक्तव्य करताना दिसत आहे, आज पुन्हा याची प्रचिती आली, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वेड लागले असून त्यांना मनोरूग्णालयात पाठवले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले  राहुल गांधी यांना स्क्रिझोफेनिया जडला आहे. त्यांना लवकरात लवकर मनोरूग्णालयात उपचारासाठी दाखल केले पाहिजे. आपल्या देशाचे पंतप्रधान यांचे काम  आणि कार्य फार मोठे आहे, मोदी हे आकाशाएवढे उतुंग आहेत, त्यांच्या पुढे राहुल गांधी म्हणजे नाल्यातील किड्या सारखे  आहेत, असे त्यांनी सांगितले.

मुख्याध्यापक मोदींना १,५०,००० लाच घेताना रंगेहाथ पकडले

राहुल गांधी  यांनी  देशांच्या पंतप्रधान यांच्या बद्दल या आधी अपशब्द वापरले आहे. राहुल गांधी हे एखाद्या नाल्यातील किड्या सारखे आहेत, ते स्वतःच भारत देश आणि त्यांच्या पक्ष काँग्रेस मुक्त करतील, असं केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी केलं आहे. पुढे त्यांनी महागठबंधन यावर भाष्य केलं. ते म्हणाले महागठबंधाच्या आघाडीला जनतेची हाय लागणार आहे, त्यांना लोक माफ करणार नाहीत.

राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांना खोटे बोलतात, मात्र ते स्वतःहा  देशात खोट्या गोष्टी पसरवत आहेत, ते लोकांना वेड्यात काढत आहेत.

मात्र त्यांनी स्वतः कडे पाहिलं तर त्यांना कोणीही वेडे समजेल. राफेल च्या प्रकरणावरून ते मोदींवर आरोप करत आहेत, किंबहुना त्यांच्यावर चिखलफेक करत आहेत.  मात्र या अाराेपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. हा  सर्व प्रकार पाहता त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यांना  मनोरूग्णालयात दाखल केले जावे अशीही मागणी चौबे यांनी केली आहे.

इतर बातम्या

घरच्यांच्या विरोधाला झुगारत ती बनली पहिली महिला वैमानिक
आता व्हॉट्सअॅप स्टेट्स वरील व्हिडीओ करता येणार डाउनलोड
पुणे : हिंजवडीतून ५६ कंपन्यांनी स्थलांतर केल्याची चर्चा