भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवेंकडून विधानसभेच्या तारखांची घोषणा ?, जाणून घ्या नेमकं काय घडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप आणि शिवसेना हे एकत्रच लढतील, मात्र कार्यकर्त्यांना २८८ जागांसाठी काम करावं लागणार आहे. विधानसभेत आपल्याला २२० जागा जिंकायच्या आहे. या निवडणूका १५ ऑक्टोबरच्या आत होतील, असे सांगत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील विधानसभांबाबत आपला अंदाज वर्तवला आहे.

विरोधी पक्षातील एका माजी महिला खासदाराबरोबर भेट झाली आहे. जिल्हाध्याक्षांबरोबर चर्चा करून त्यांना लवकरच भाजपमध्ये घेऊ असा, असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला आहे. याकारणाने विरोधी पक्षातील नेमकी कोणती महिला नेता भाजपच्या संपर्कात आहे यावर चर्चांना उधाण आले आहे.

पक्षात कोणालाही घ्या, पक्षात येण्यास बंदी नाही. काँग्रेसच्या माजी आमदार, खासदाराजवळ बसलं की त्यांना वाटतं आपल्याला कधी भाजपात घेतात, सध्या कोणीही भाजपमध्ये येण्यास तयार आहे. एका माजी महिला खासदाराला भेटलो आणि अंदाज घेतला. आता जिल्हा अध्यक्षांशी बोलतो आणि पक्षात घेतो असे रावसाहेब दानवे यांनी पुण्यात सांगितले.

निवडणूक काळात फिरलं नाही तरी फरक पडत नाही –
या निवडणूकीत मतदारसंघात गेलो नाही, बूथवर गेलो नाही. फक्त मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. पण ती त्याला ही गेलो नाही. कारण आजारी होतो. तरी साडेतीन लाख मतांनी निवडून आलो. निवडणूक काळात फिरलं नाही तरी काही फरक पडत नाही. कारण काम केलेले असते असे म्हणत दानवेंनी आपल्या विजयावर भाष्य केले.

काँग्रेसवर टीका –
काँग्रेसला आता अध्यक्ष मिळत नाही, त्यांची स्थिती सध्या खूप वाईट आहे. भाजपला मात्र अच्छे दिन आलेत. मोदींची लोकप्रियता, शाहांची रणनीती आणि कार्यकर्त्यांचे कष्ट यामुळे हे शक्य झालं. काँग्रेसचे नेते रणांगण सोडून पळत आहेत. असे म्हणत दानवेंनी काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी गांधी कुटूंबावर देखील टीका केली. ते म्हणाले की चांगले दिवस असताना घरातला अध्यक्ष आणि वाईट दिवस आले की कोणी पण अध्यक्ष करायला काँग्रेस तयार होते.

आरोग्यविषयक वृत्त

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी