मुस्लिमांच्या घरी जाण्यास भाजपच्या ‘या’ मंत्र्याचा नकार, म्हणाले – ‘उपद्रवींच्या घरी मी का जाऊ ?’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – नागरिकता संशोधन कायदा आणि राष्ट्राय नागरिकता विधेयक यावरून अनेक ठिकाणी विरोध दर्शविला गेला. यामुळे अनेक ठिकाणी हिंसात्मक घटना घडल्या होत्या. २० डिसेंबर रोजी बिजनोरमध्ये झालेल्या हिंसेत दोघांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री कपिल देव गुरुवारी हिंसा पीडितांची चौकशी करण्यासाठी गेले होते. यावेळी मृतांच्या घरी जाणार का, असा प्रश्न देव यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत ते म्हणाले की, मी उपद्रवी लोकांच्या घरी का जावे ? मी तिथे का जायला हवे ? जे हिंसा करत आहेत. ते समाजाचा भाग कसा होऊ शकतात, असा प्रश्न करुन त्यांनी हिंदू मुस्लीमचा मुद्दा नाही, असे म्हटले.

उत्तर प्रदेशमध्ये नागरिकता संशोधन कायद्याला खूप विरोध होताना दिसत आहे. यामुळे अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शने झाली. यामुळे अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले होते. या पार्श्वभूमीवर बिजनोरमध्ये झालेल्या हिंसेनंतर उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री कपिल देव हे पीडितांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी त्यावेळी मुस्लिमांच्या घरी जाण्यात स्पष्ट नकार दिला.

नागरिकता संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता विधेयक यावरून अनेक ठिकाणी हिंसा झाली. त्याचबरोबर बिजनोरमध्ये झालेल्या हिंसेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या अंतर्गत 43 लोकांना आतापर्यंत नोटीस बजावण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/