भाजप आमदाराचा ‘प्रताप’, भर रस्त्यात होमगार्डला मारहाण

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्यामध्ये वाहतुकीचे नियमन करत असलेल्या एका होमगार्डला भाजप आमदाराने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना मंगळवार (दि.3) सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील टिळक चौकात घडली. भाजपचे वणी येथील आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी होमगार्डला मारहाण केली असून अद्याप गुन्हा झालेला नाही.

मारहाण झाल्यानंतर हे प्रकरण वणी पोलीस ठाण्यात पोहोचले. होमगार्डने तक्रार देऊ नये म्हणून आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून समजूत काढण्यात येत आहे. तसेच काही पोलिसांकडूनही त्याने आमदारांच्या विरोधात तक्रार करु नये यासाठी आमदारांच्या कार्यकर्त्यांना मदत केली जात असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येतेय. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून आमदारांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली.

दरम्यान, आमदार बोदकूरवार यांनी मारहाण केल्याच्या आरोप फेटाळून लावला आहे. होमगार्ड साध्या वेशात वाहतूक नियंत्रण करत होता. म्हणून त्याला गणवेश घालून ड्युटी करण्याचा सल्ला आपण दिल्याचे बोदकूरवार यांनी सांगितले. पोलीस ठाण्यात होमगार्ड आणि आमदार उपस्थित असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like