NIA कोर्टाचा आदेश : भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह हाजीर हो !

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना आता आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे आदेश NIA च्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्या सध्या जामीनावर बाहेर आहेत. साध्वी प्रज्ञासिंह नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये भोपाळमधून निवडून आल्या आहेत.

यापूर्वीही लोकसभा निवडणूका सुरु असताना NIA न्यायालयात सुनावणी सुरु असताना न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकराणातील एकही आरोपी सध्या न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहात नसल्याने एनआयए विशेष न्यायालयाने नाराजी व्यक्त करत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह इतर आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्य़ांना भोपाळमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर त्या भोपाळमधून निवडणूक जिंकल्या आहेत. मात्र आज झालेल्या सुनावणीत न्यायालयात त्यांच्या सततच्या गैरहजेरीवर नाराजी व्यक्त करत न्यायालायने त्यांना आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

२००८ साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांना याप्रकरणात एनआयए न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली होती.