BJP MP Ramesh Bidhuri Unparliamentary Words | लोकसभेत भाजपा खासदाराकडून शिवीगाळ; विरोधकांच्या टीकेनंतर भाजपाने उचलले ‘हे’ पाऊल (Video)

नवी दिल्ली : BJP MP Ramesh Bidhuri Unparliamentary Words | भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांना लोकसभेत शिवीगाळ करत अपशब्द वापरले. या प्रकरणी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप इत्यादी विरोधी पक्षांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. यानंतर भाजपाने रमेश बिधुरी यांच्याविरोधात कारवाईचे पाऊल उचलले आहे. तसेच यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. (BJP MP Ramesh Bidhuri Unparliamentary Words)

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी लोकसभेत रमेश बिधुरी चांद्रयान-३च्या यशाबाबत बोलत होते. यावेळी बसपा खासदार दानिश अली यांनी चांद्रयान-३ मोहिमेचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाटल्याचा आरोप केला. यामुळे बिधुरी बिथरले, आणि त्यांनी सभागृहात गंभीर आरोप करत शिवीगाळ सुरू केली. (BJP MP Ramesh Bidhuri Unparliamentary Words)

बिधुरी यांच्या या शिवीगाळीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिवीगाळ करताना ते म्हणत आहेत की, मोदीजी श्रेय घेत नाहीत. श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भXX…ए उग्रवादी..बोलू देणार नाही तुला कधी उभं राहून. सांगून ठेवतो. ए उग्रवादी..कठुवे…हे दहशतवादी आहेत… उग्रवादी आहेत.. हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचे काही ऐकू नका, बाहेर फेका याला…

या गंभीर प्रकाराबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सूचनेवरून बिधुरी यांना भाजपाने कारणे दाखवा
नोटीस बजावली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

दरम्यान, बिधुरी यांनी केलेल्या शिवीगाळीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलगिरी व्यक्त करताना
म्हटले की, जर सत्ताधारी सदस्याच्या कोणत्याही विधानामुळे विरोधी पक्षांच्या भावना दुखावल्या असतील,
तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौऱ्याबाबत दिले स्पष्टीकरण; कायदेतज्ज्ञांच्या घेतल्या भेटी

Bachchu Kadu On BJP | ‘एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यास…’, बच्चू कडूंचा भाजपला इशारा