भाजपकडून शरद पवारांना राष्ट्रपती पदाची ‘ऑफर’ ? राज्यात राजकीय ‘भूकंप’ ?

मुबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने दिलेला शब्द न पाळल्याने शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी विरोधी पक्षांशी हात मिळवणी केली आणि राज्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र राज्यात अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नसताना केंद्रातून याकडे लक्ष घालण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात नवीनच चर्चाना उधाण आले आहे.

भाजपने राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी शरद पवारांना राष्ट्रपती पदाची ऑफर दिली आहे तसेच केंद्रात आणि राज्यात देखील सत्तेमध्ये सन्मानजनक वाटा दिला जाणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले होते. यामुळे आता राज्यात सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एक नवीन समीकरण पहायला मिळणार का याबात चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने याबाबत स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाही.

शरद पवार भूमिकेवर ठाम
दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नाला फेटाळून लावले होते. त्यामुळे राष्ट्रवादी सध्या तरी राज्यात सत्ता स्थापनेबाबत विचार करत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आता सत्तास्थापनेबाबत काय घडामोडी सूर होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर होणार भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शरद पवार नरेंद्र मोदींशी चर्चा करणार असल्याची राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. मात्र ही भेट राजकीयही असल्याची चर्चा आहे.संसद भवनात आज दुपारी साडेबारा वाजता शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची ही भेट होण्याची शक्यता आहे. शरद पवार हे पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत माहिती देणार आहेत असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळदेखील नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

Visit :  Policenama.com