भाजपाध्यक्ष अमित शाहांची प्रकृती पुन्हा बिघडली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गेल्याच आठवड्यात स्वाईन फ्लूचं निदान झालं होतं. यानंतर त्यांच्यावर उपचारही सुरू होते. परंतु अमित शाह यांची प्रकृती पुन्हा बिघडली असल्याचं समोर आलं आहे.  ताप वाढल्यामुळे अमित शाह पश्चिम बंगालहून दिल्लीला परतल्याचं समजत आहे. अंगात ताप असतानाही ते सकाळच्या वेळात एका रॅलीत सहभागी झाले होते.
अमित शाह पश्चिम बंगालमध्ये सभेसाठी गेले होते. अंगात ताप असतानाही ते सकाळच्या वेळात एका रॅलीत सहभागी झाले. मात्र त्यावेळीही ते सारखे खोकत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे शाहांना तात्काळ घरी परतावं लागलं असं समजत आहे. शाहांच्या पश्चिम बंगालमध्ये नियोजित पुढील सर्व सभा रद्द होण्याची शक्यता आहे कारण डॉक्टरांनी अमित शाहांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्याच आठवड्यात अमित शाहांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. शाह यांनी स्वत: ट्वीट करुन आपल्याला स्वाईन फ्लू झाल्याची माहिती दिली होती. देवाचे आशिर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांनी लवकरच बरा होईन, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर दोन-तीन दिवसांत त्यांना ‘एम्स’मधून डिस्चार्जही देण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडली आहे.

अमित शाह यांचा नियोजित सांगली, सातारा, कोल्हापूर दौरा रद्द

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा नियोजित सांगली, सातारा, कोल्हापूर दौरा रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. समाेर आलेल्या माहितीनुसार, अमित शाह  स्वाईन फ्लू झाल्यामुळे आणखी विश्रांती घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. मुख्य म्हणजे येत्या 24 जानेवारीला पदाधिकारी मेळावा होणार आहे. परंतु अमित शाह हे या मेळाव्याला अनुपस्थित असणार असल्याचेही समजत आहे.