BJP-Shivsena Alliance | ‘… तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत असते’, शिवसेनेच्या या दिग्गज मंत्र्याचं वक्तव्य

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  BJP-Shivsena Alliance | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा फिसकटल्याने राज्यातील दोन्ही पक्षांची युती (BJP-Shivsena Alliance) तुटली. भाजपचे सर्वाधिक आमदार (MLA) निवडून आले असताना त्यांना विरोधात बसावे लागले. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) सोबत महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) स्थापना करुन राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले. यातच आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संयमाने भूमिका घेतली असती तर शिवसेनेचे 56 आमदार हे भाजपसोबत असते, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युती (BJP-Shivsena Alliance) तुटल्यापासून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
चंद्रकांत पाटील सतत काहीना काही टीका करत असतात, त्याच वेळेस ते संयामाने वागले असते तर त्यांच्यासोबत शिवसेनेचे 56 आमदार दिसले असते.
असं विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. गुलाबराव पाटील यांनी पंढरपूरमध्ये (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.
त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

 

10 हजाराचे पॅकेज अपुरे

विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी गेलेल्या गुलाबराव पाटील यांनी एक साकडं घातलं आहे. कोरोनाचं संकट कमी झालं आहे, संकट असेच कमी होऊ दे असं साकडं त्यांनी घातलं.
राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज (10 thousand crore package) जाहीर केले आहे.
परंतु हे पॅकेज शेतकऱ्यांना अपुरे असल्याची खंतही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
भाजपमधील नगरसेवक (Corporator) पुन्हा भजापमध्ये जात आहेत, यावर बोलताना पाटील म्हणाले, या नगरसेवकांना भाजपने अपात्रतेची भीती दाखवली आहे.

 

Web Title : BJP-Shivsena Alliance | if chandrakant patil maintain restraint then 56 mla of shiv sena would have been with bjp said shivsena minister gulabrao patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | अभिनंदनिय ! CS च्या परीक्षेत पुण्याची वैष्णवी बियाणी देशात प्रथम !

Rupali Chakankar | भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वत:हूनच मान्य केलं – रूपाली चाकणकर

Mask Causing Headache | मास्क घातल्याने डोकेदुखी होतेय का? मग जाणून घ्या यामागील कारण! ‘या’ पध्दतीनं करा उपचार