भाजपने ‘बेटी भगाओ’ चा कार्यक्रम सुरू केलाय का? उद्धव ठाकरेंचा सवाल 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन
महिलांबाबत  केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजपाचे आमदार राम कदम यांच्यावर शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ”निवडणूक काळात वाल्याचा वाल्मिकी करणाऱ्या भाजपने आता “बेटी भागाओ’चा कर्यक्रम सुरु केला आहे का ? असा सवाल करीत’ आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्याचा वाल्मिकी करू नये, तर धाडस करून राम कदमांवर कारवाई करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. वांद्रे येथील  रंगशारदा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणले,”  माता भगिनींचा अपमान करणाऱ्या कदमांना कोणीही उमेदवारी देऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी या वाल्याचा वाल्मिकी करू नये. त्यांनी धाडस दाखवावे आणि कदमांवर कारवाई करावी. त्यांचा राजीनामा घ्यावा’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, महामंडळांची यादी सरकारला दोन वर्षापूर्वीच दिली होती. त्यामुळे आम्हाला कशाचीही अपेक्षा राहिली नसल्याचं उद्धव म्हणाले”.
हार्दिकच्या लढ्यात शिवसेनेची साथ
यावेळी त्यांनी पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेलला फोन केल्याचंही सांगितलं. ‘गेल्या १२ दिवसापासून हार्दिकचं उपोषण सुरू आहे. त्याला उपोषण सोडायला सांगितलं. उपोषणाने प्रश्न सुटणार नाहीत. हे संवेदनाहीन लोक काहीही करणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात लढणं हाच एकमेव पर्याय आहे. तुझ्या प्रत्येक लढ्यात आमची तुला साथ आहे’, असं हार्दिकला सांगितल्याचं उद्धव म्हणाले. पाकिस्तानबरोबर सरकारची चर्चा होऊ शकते तर हार्दिकबरोबर चर्चा का होऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला.
तर हे दुर्देव…
सनातन आणि नक्षली कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याबाबत त्यांना विचारण्यात आले. तेव्हा हिंदू दहशतवादी आणि शहरी नक्षलवादी अशी लेबलं का लावता? असा सवाल त्यांनी केला. आरोपात तथ्य असेल तर वेळेत आरोपपत्र दाखल करा. त्यासाठी दहा-दहा वर्ष घालवू नका, असं सांगतानाच या सरकारच्या काळात हिंदू दहशतवाद बोललं जात असेल तर ते दुर्देव आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.
नोटाबंदी फसली आहे. आरबीआयच्या अहवालातून ते स्पष्ट झालंय. पण नोटाबंदी फसलीय हे भाजप स्वीकारणार आहे काय? त्याबद्दल हे सरकार माफी मागणार आहे काय? असा सवाल त्यांनी यावेळी केला. पुन्हा नोटाबंदी करण्यात येणार असल्याची बातमी आली आहे. तसं असेल तर देशात पुन्हा अराजक निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना सरकार मार्गदर्शनासाठी बोलावणार आहे. ते चुकीचे होते म्हणून तुम्ही त्यांना जायला भाग पाडलंत. मग पुन्हा मार्गदर्शनासाठी त्यांना का बोलावलं जात आहे?, असा सवालही त्यांनी केला.
[amazon_link asins=’B011IRCV8C,B0748NPV86′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f486902d-b0f7-11e8-a27c-ff095eed6ebd’]