उदयन राजेंकडून पगडी घालून घेऊन आम्हाला ‘टोप्या’ घातल्या उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता न स्थापन करण्याबाबत शिवसेनेला जबाबदार धरले आहे. या बाबतच्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते म्हणून मी पाठींबा दिला होता. परंतु असं काही ठरलं नव्हतं हे तुम्ही बोलणार असाल तर मी खोटं बोलून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपच्या खोटेपणाचे पितळ उघडे पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी उदयन राजेंचा दाखला दिला. उदयन राजेंनी अनेकदा नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली होती. परंतु भाजपने उदयन राजे यांच्याशी जवळीक केली आणि तुम्ही उदयन राजेंकडून पगडी घालून घेऊन आम्हाला टोप्या घातल्या असल्याचे परखड मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडले.

महाराष्ट्राच्या जनतेचा जेवढा विश्वास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे तेवढा विश्वास अमित शहा आणि कंपनीवर नाही असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत भाजप आणि त्यांच्या खोटारडेपणावर वारंवार बोट ठेवले.

Visit : Policenama.com 

 

You might also like