भाजपची सरशी ; काँग्रेसच्या प्रवक्त्याचा केला धक्कादायक पराभव

जिंद : हरियाणा वृत्तसंस्था – जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा धक्कादायक पराभव केला असून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना विधानसभेत जाण्यापासून रोखले आहे. एवढ्या वरच भाजप थांबले नाही तर काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवाला यांना तिसऱ्या क्रमांकावर फेकून काँग्रेसचा दारुण पराभव घडवून आणला आहे.

असा आहे निकाल
भाजपचे उमेदवार कृष्णलाल मिड्ढा यांना १२ हजार ९३५ मतांनी विजय मिळवला आहे. जननायक जनता पार्टीचे दिग्विजय सिंह चौटाला यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. तर २२ हजार ७४० मते घेऊन काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला तिसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचा हा पराभव त्यांना आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करायला लावणारा आहे. त्याच प्रमाणे सुरजेवाला अलीकडच्या काळात भाजपवर चांगलीच आगपाखड करत होते म्हणून त्याचा कडता काढण्यासाठी भाजपने निवडणुकीच्या कामात कसलीच कसर बाकी ठेवली नव्हती. याचाच परिपाक म्हणून सुरजेवाला यांचा पराभव घडून आला आहे.

२८ जानेवारी रोजी या ठिकाणी मतदान नोंदवून घेण्यात आले. त्या मतदारसंघात ७६ टक्के मतदान झाले होते. काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) आणि जननायक जनता पार्टी या तीन पक्षात जिंद मतदारसंघामध्ये मुख्य लढत होती. आयएनएलडी पार्टीचे आमदार हरिचंद मिड्ढा यांचे ऑगस्ट २०१८ मध्ये निधन झाल्याने त्या ठिकाणी पोट निवडणूक घेण्यात आली आहे. भाजपाने हरिचंद मिड्ढा यांचा मुलगा कृष्णा मिड्ढा यांना उमेदवारी देऊन सुरजेवाला यांना शह देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. भाजपाने देशभर पोटनिवडणुकीत होणाऱ्या पराभवाची कसर विधानसभेच्या या विजयाने भरून काढली आहे.