पक्षात सन्मान अन् प्रतिष्ठा नाही, भाजपाच्या ‘या’ आमदाराचा राजीनामा

गांधीनगर : वृत्तसंस्था – गुजरातमधील सावली चे भाजपाचे आमदार केतन इनामदार यांनी गुजरात सरकारमध्ये सन्मान आणि प्रतिष्ठा सुरक्षित नसल्याचे कारण देत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आपण इे मेलद्वारे आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी, मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी यांच्याकडे पाठविला असल्याचे केतन इनामदार यांनी सांगितले.

आपल्या मतदारसंघाची सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांनी उपेक्षा केली आहे. आपल्याप्रमाणेच अनेक भाजपाचे आमदार हताश झाले आहेत. आपले पक्षनेते आणि नोकरशहांकडून मिळालेल्या वागणूकीने अपमानित झाल्याची इनामदार यांची भावना झाली आहे.

इनामदार आपला राजीनामा मागे घेतील, अशी अपेक्षा भाजपाकडून व्यक्त केली जात आहे. केतन इनामदार यांच्या या पावित्र्यामुळे गुजरात भाजपामध्ये आलबेल नसल्याचे समोर आले आहे. इनामदार यांच्या कृत्याला पाठिंबा देत काँग्रेसने त्यांना आपल्या पक्षात येण्याचे आवाहन केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –