भाजपाची नवी मोहीम: नमो अॅप’ वरुन टी-शर्ट, टोप्या, पेनची विक्री

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

निवडणूका जवळ येताच राजकीय पक्ष आपापले डावपेच आखायला सुरवात करतात, त्याच प्रमाणे लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भाजपाने आपले डावपेच आखायला जोरदार सुरवात केल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपा नेत्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपाने प्रचाराचा जास्त भर हा सोशल मीडिया वर दिला आहे, याचाच आधार घेत नरेंद्र मोदी यांच्या खासगी मोबाईल अप्लिकेशन  ‘नमो अॅप’ वरुन एक नवीन मोहिम सुरू केली आहे. यांची किंमत ९९ रुपयांपासून २९९ रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078LG24ZB,B07DJCJ9FD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4b43ea7-bb20-11e8-bbb9-29df88da7193′]

याबाबत अधिक माहिती अशी की,  १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून या मोहिमेचे नारळ फोडले आहे. नरेंद्र मोदी यांच्या खासगी मोबाईल अप्लिकेशन  ‘नमो अॅप’ वरून टी-शर्ट, टोप्या, वह्या, पेन,  स्टिकर, मॅगनेट अश्या उत्पादनांची विक्री सुरु केली आहे. इतकेच नव्हे, तर आतापर्यंत जवळपास ५ मिलियन लोकांनी नमो अॅप डाउनलोड केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑफिशियल नमो अॅप हा देशभरात खूप प्रसिद्ध झाला आहे.

विशेष म्हणजे, या अॅपवरुन सामान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ब्रँड कॉलीटी, योग्य भावात उत्पादने मिळावी हा त्यामागचा हेतू आहे. तसेच या उत्पादन विक्रीतून जो पैसा मिळेल तो गंगा स्वच्छतेसाठी वापरला जाईल, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. भाजपच्या या नमो अॅप नंतर काँग्रेसही निवडणुकीच्या तोंडावर यासारखाच एक अॅप लॉन्च करणार असल्याची माहिती सूत्रां कडून मिळाली आहे.

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राला आहे ‘हा’ आजार