Blade India | पुण्यातून मुंबईसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Blade India | धावपट्टी दुरुस्तीसाठी लोहगाव विमानतळ १६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान बंद राहणार आहे. पुण्यापासून तब्बल २५ हून अधिक शहरांशी असणारी एअर कनेक्टिव्हिटी तुटणार आहे. त्यामुळे उद्योजक, नोकरदार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्या पार्श्ववभूमीवर पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी हेलिकॉप्टरची सेवा प्रवाशांना उपलब्ध झाली आहे. १६ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरु होणार असून यासाठी प्रवाशांना आता थोडे ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. ब्लेड इंडियाच्या (Blade India) संकेतस्थळावर या हेलिकॉप्टर सेवेबाबतचे अधिक तपशील देण्यात आले आहेत.

पुण्यातील खराडी (Kharadi) येथून हे हेलिकॉप्टर सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. मुंबईत जुहू येथे ४५ मिनिटांत ते पोहचेल. तर मुंबईहून ४ वाजून ३० मिनिटांनी हे हेलिकॉप्टर निघून पुण्यात पोहचेल. तसेच मुंबईतून सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी हेलिकॉप्टर पुण्यासाठी निघेल. ते (Blade India) हेलिकॉप्टर दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी पुण्यातून मुंबईला निघेल. या हेलिकॉप्टरमध्ये एकाचवेळी ५ प्रवासी प्रवास करू शकतील. प्रवाशाने रिटर्न तिकिट बुक केले तर ते २९ हजार ५०० रुपयांना असेल. एका बाजूचे तिकिट १५ हजार ५०० रुपये असेल. यामुळे पुण्याहून तात्काळ मुंबईला जाणे अतिशय सोयीचे झाले आहे. याचा उद्योजकांसह इतरांना देखील फायदा होणार आहे.

हे देखील वाचा

Chitra Wagh | रुपाली चाकणकर यांना ‘शूर्पणखा’ संबोधलेलं नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

NCB च्या कारवाईवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा नवीन गौप्यस्फोट, केले अतिशय गंभीर आरोप (व्हिडीओ)

Nora Fatehi | 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED कार्यालयात पोहचली नोरा फतेही, जॅकलीनची सुद्धा पुन्हा होणार चौकशी (व्हिडीओ)

Rupali Chakankar | भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वत:हूनच मान्य केलं – रूपाली चाकणकर

Udayanraje Bhosale |  उदयनराजेंच्या ताफ्यात नव्या BMW 007 ची ‘एन्ट्री’

Pizza मिळाला नाही म्हणून 18 वर्षाच्या मुलीनं दिला जीव, वाढदिवसाच्या 2 दिवसानंतर निघाली अंत्ययात्रा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Blade India | pune lohegaon airport closure chopper firm to operate sorties to from mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update