‘डेबिट-क्रेडिट’ कार्ड हरवलंय तर ‘नो-टेन्शन’, आता कस्टर केअरला फोन न करता ‘या’ पध्दतीनं करा ‘तात्काळ’ ब्लॉक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येकाकडे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असतेच. मात्र हे कार्ड बाळगण्याबरोबरच त्याची सुरक्षा देखील फार महत्वाची आहे. त्यामुळे हे कार्ड जर गहाळ झालेच तर ते सर्वात आधी ब्लॉक करणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे हरवल्यास कुणी तुमच्या खात्यातून पैसे काढण्याआधी ते तुम्हाला ब्लॉक करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला हे कसे ब्लॉक करायचे याची माहिती सांगणार आहोत. बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून तुम्ही सर्वात सोप्या मार्गाने हे कार्ड ब्लॉक करू शकता. मात्र आम्ही तुम्हाला याचा दुसरा मार्ग सांगणार आहोत.

या पद्धतीने करा कार्ड ब्लॉक  
स्टेप 1 : सर्वात आधी तुम्हाला तुमच्या नेट बँकिंगवर लॉगइन करावे लागणार आहे. त्यानंतर तुमचा डॅशबोर्ड उघडल्यानंतर तुम्हाला यावर ‘ई-सर्व‍िसेज’ असा पर्याय दिसून येईल.

स्टेप 2 : या ठिकाणी आल्यानंतर कार्ड सर्व्हिस या भागात तुम्हाला जायचे आहे. त्यावर ‘ब्लॉक एटीएम कार्ड’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर दुसरी विंडो ओपन होईल. यावर तुम्हाला ब्लॉकचे कारण टाकायचे आहे.

स्टेप 3 : यावेळी याठिकाणी तुमच्या सर्व डेबिट कार्डची माहिती उपलब्ध होणार आहे. मात्र तुम्हाला जे कार्ड ब्लॉक करायचे आहे त्यावर क्लिक करून हि माहिती जमा करावी लागणार आहे.

स्टेप 4 : हे सर्व सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. त्यानंतर हा नंबर टाकल्यानंतर तुमची हि प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचे कार्ड ब्लॉक होईल.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी