Blood Increasing Food | तुम्ही थकवा आणि निद्रानाशामुळे त्रस्त असाल तर ‘ही’ 5 फळे करतील तुमची समस्या दूर…

पोलीसनामा ऑनलाईन टीम | खराब जीवनशैलीमुळे अनेकांना अॅनिमियाचा त्रास होतो (Blood Increasing Food). शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, भोवळ यासारख्या समस्या उद्भवतात. रक्ताच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शरीरात दीर्घकाळ रक्त कमी (Deficiency Of Blood) राहिल्याने अनेक घातक आजार होऊ शकतात. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी या पदार्थांचे सेवन केल्याने होतो फायदा (Blood Increasing Food).

डाळिंब (Pomegranate) –

डाळिंबामध्ये लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी सारखे भरपूर पोषक तत्व असतात. जे शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात. शरीरातील अशक्तपणा दूर करायचा असेल, तर तुम्ही डाळिंबाचा रस (Pomegranate Juice) पिऊ शकता. डाळिंबामध्ये अनेक पोषक घटक आढळतात.

ड्रायफ्रूट्स (Dry Fruits)

काजू, शेंगदाणे, बदाम आणि पिस्ता यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने असतात. ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन पातळी (Haemoglobin Level) सुधारते. तुमच्या शरीरात आधीच लोहाची कमतरता असेल, तर तुमच्या रोजच्या आहारात या ड्रायफ्रुट्सचा नक्की समावेश करावा (Blood Increasing Food).

बीटरूट (Beetroot)

बीटरूटमध्ये अनेक पोषक तत्त्वे आढळतात. जे अॅनिमिया दूर करण्यास मदत करतात. बीटरूटला रक्त वाढवणारे यंत्र म्हणतात. यामध्ये फॉलिक अॅसिड (Folic Acid) आणि अँटीऑक्सिडंट्स (Antioxidant) भरपूर प्रमाणात असतात.
जे हिमोग्लोबिन (Haemoglobin) वाढवण्यास मदत करतात.

पालक (Spinach)

हिरव्या पालेभाज्या आणि पालक ही रक्त वाढवणारी भाजी आहे. यामध्ये फोलेट, आयर्न आणि व्हिटॅमिन सी (Vitamin C)
सारखे पोषक घटक असतात. जे शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात.

कडधान्य (Pulse)

कडधान्यामध्ये असलेले लोह शरीरातील अशक्तपणा (Weakness In Body) दूर करण्यास मदत करते.
याशिवाय धान्य आणि कडधान्यांमध्ये प्रथिने (Protein), फायबर (Fiber) आणि जीवनसत्त्वे (Vitamins) असतात,
ज्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. यासोबतच याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Dhom Dava Kalwa | धोम डावा कालवा फुटला, मध्यरात्री ओढ्याला पुर आल्याने ऊसतोड मजुरांचे संसार वाहून गेले
Pune Police MCOCA Action | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ‘मोक्का’ची ‘सेन्चुरी’ (नॉट आऊट), आतापर्यंत 649 आरोपींवर MCOCA कारवाई