Why Aamir Khan Divorced Kiran Rao | आमिर-किरण यांनी का घेतला घटस्फोट? जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसासापूर्वी चित्रपट श्रुष्टीत आणि राज्यात चर्चा रंगू लागल्या. अभिनेता अमीर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) या दोघांनी जवळपास पंधरा वर्ष एकत्र आपला संसार मांडला होता. यानंतर अचानक काही दिवसापूर्वी घटस्फोट (Divorce) घेत असल्याच्या बातम्या दाहीदिशा फिरू लागल्या. यावरून एकच खळबळ उडाली. अखेर त्यांचा घटस्फोट झाला. यांनतर चाहत्यांनी त्यांना घटस्फोटाचं कारण विचारलं असता. सत्य कारण समोर आलं नव्हतं. मात्र आता प्रत्यक्ष कारण समोर आलं आहे. (Why Aamir Khan Divorced Kiran Rao)

आमिर खान आणि किरण राव हे दोघेही मागील काही वर्षात विवाह (Marriage) या संकल्पनेच्या पलिकडे विचार करत होते. त्यांच्यामध्ये कुठलेही वाद अथवा मतभेद नव्हते. मात्र, आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन मात्र बदलला होता. म्हणून यापुढे फक्त मित्र म्हणूनच एकत्र राहू असा विचार त्यांनी स्वतः केला आहे. म्हणजेच, ही प्रक्रिया दिसते तितकी सोपी नव्हती. त्यांना आपली मानसिक तयारी करायला तब्बल दोन वर्ष लागली आहेत. 2019 पासून ते वेगळा होण्याचा विचार करत होते. परंतु शेवटी 2021 या वर्षात त्या दोघांनी घटस्फोट घेतला आहे.

दरम्यान, किरण रावच्या अगोदर आमिर खानचा (Aamir Khan) विवाह रीना दत्तासोबत झाला होता. तर
2000 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर किरण राव आणि आमिर खान या दोघांचा विवाह झाला. तर,
लगान या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. फक्त एका फोनच्या संभाषणानंतर आमिर खान आणि किरण राव मनाने एकमेकांच्या जवळ आले होते. तसेच पुढं दोघात मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात देखील झालं होतं.

हे देखील वाचा

Dombivli Crime | किरकोळ कारणावरुन शेजाऱ्यांत तुंबळ हाणामारी; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Pune Crime | महाराष्ट्रासह देशभरातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ज्येष्ठ महिलांना पेढ्यातून गूंगीचे औषध देऊन लुटणार्‍या झारखंडच्या पिंकी परियालला पुणे पोलिसांकडून अटक

MLA Atul Bhatkhalkar | अतुल भातखळकर यांना अटक; BJP आमदार म्हणाले – ‘पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  why aamir khan divorced kiran rao know about reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update