Blood Sugar Myths And Facts | मधुमेहाच्या लोकांनी गोड का खाऊ नये? जाणून घ्या काय आहे सत्य..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Blood Sugar Myths And Facts | मधुमेह हा एक असाध्य आजार आहे. हल्ली अनेक लोक त्यांच्या जीवनशैलीमुळं मधुमेहाचे शिकार झालेले पाहायला मिळतात. (Blood Sugar) मधुमेह मुख्यत: खराब आहार आणि रोजच्या जीवशैलीमुळं होतो. वैद्यकिय भाषेत साखरेचे प्रमाण वाढण्याच्या प्रक्रियेला हायपरग्लायसेमिया असं म्हणतात. मधुमेहामध्ये रुग्ण व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. तसेच जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. (Blood Sugar Myths And Facts)

 

भारताला मधुमेहाची राजधानी सुद्धा म्हटलं जात. मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी आहाराची काळजी घेणं गरजेचं असतं. तसेच दिलेलं पथ्य पाळणं देखील अत्यंत महत्वाचं असतं. मधुमेहाबद्दल लोकांचे अनेक गैरसमज आहे. लोकदेखील त्या गैरसमजांवर विश्वास ठेवतात. काही अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या मधुमेहाच्या रुग्णांनी पाळणं आणि त्यांना माहिती असणं गरजेच आहे. तसेच मधुमेहा संबंधित अनेक प्रचलित समज आणि त्यामागं सत्य (Diabetes Myth And Facts) आहे.

 

मधुमेह (Blood Sugar) असणाऱ्या व्यक्तींनी कृत्रिम साखरेचा वापर करणं अधिक धोकादायक आहे.
अनेक लोक रक्तातील पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी साखरेऐवजी कृत्रिम स्वीटनरचे सेवन करतात.
किंबहुना त्यांना असं वाटते की, साखरेपेक्षा कृत्रिम साखर, साखर विरहित गोड (Sugar Free) पदार्थ सेवन करणं अधिक फायदेशीर आहे.
मात्र, तज्ञांच्या मते कृत्रिम साखर किंवा शुगर फ्रि (Sugar Free) स्वीटनरचे सेवन केल्यास इन्सुलिन रेझिस्टन्सची (Diabetes Insulin Resistance) स्थिती बिघडू शकते.

गोड पदार्थांमुळं मधुमेह वाढण्याची शक्यता असते.
मधुमेह म्हटलं की, सगळ्यात आधी लोकांच्या मनात येतो तो गोड पदार्थ, मधुमेह होण्यामागं केवळ साखर किंवा गोड पदार्थ हेच कारण नाही.
लठ्ठपणामुळंसुद्धा मधुमेह होऊ शकतो. मिठाई खाल्यानं सुद्धा वजन वाढत. (Blood Sugar Myths And Facts)

 

दरम्यान, बारिक अंगकाठी असणाऱ्या लोकांना मधुमेह होत नाही, असं म्हटलं जात.
परंतु असं काही नसून बारिक लोकांना देखील मधुमेह (Diabetes) होतो.
मात्र बहुतेक लोकांच्या शरीरातील चरबी बाहेरून दिसत नाही, तरी ती आतून दिसते.

 

Web Title :- Blood Sugar Myths And Facts | blood sugar myths and facts related to diabetes know what is right and what is wrong

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mayor Muralidhar Mohol | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा पुन्हा बंद, पुण्यातील शाळांबाबत महापौरांनी सांगितलं…

 

Uric Acid Cause And Problem | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने शरीरात कोणत्या अडचणी निर्माण होतात? ते कसे कमी करावे, जाणून घ्या

 

Small Savings Schemes | मोदी सरकारचा निर्णय ! अल्प बचत योजनांवरील व्याजदर कायम राहणार; जाणून घ्या