बीडमध्ये शरीर सौष्ठव आणि बाइक स्टंट स्पर्धेचे आयोजन, 13 जिल्ह्यातील 250 बॉडी बिल्डर सहभागी होणार : डॉ. इलियास खान

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग फेडरेशन आणि बीड येथील सीएनएस जिमच्या संयुक्त विद्यमाने सीएनएस श्री 2020 मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र शरीर सौष्ठव आणि बाइक स्टंट स्पर्धा 14 मार्च शनिवार रोजी शहरातील संभाजी महाराज क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आली. यामध्ये तेरा जिल्ह्यातील 250 बॉडी बिल्डर सहभागी होणार असल्याची माहिती सीएनएसचे संचालक डॉ. इलियास खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असो. व मराठवाडा बॉडी बिल्डींग आणि फिजीक स्पोर्ट्स असोसिएशन संलग्न सीएनएस फिटनेस, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यात प्रथमच सीएनएस श्री 2020 स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत मराठवाड्यातील आठ आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अ.नगर असे 5 एकूण 13 जिल्ह्यातील 250 बॉडी बिल्डर सहभागी होणार आहेत.

सदरील स्पर्धा 55, 60, 65, 70 किलो वजनी गटात होणार आहेत. प्रथम येणाऱ्यास 7 हजार, द्वितीय 6 हजार, तृतीय 5 हजार 4, 3 हजार असे रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचा मानाचा सीएनएस श्री पुरस्कार विजेत्यास ट्रॉफी व रोख रक्कम 31 हजार, दुसरे पारीतोषक रोख रक्कम 21 हजार रुपये ट्रॉफी व प्रमाणपत्र असे आहे. एकूण रोख बक्षीस 2 लाख 30 हजार पर्यंत आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारे अशी बाइक स्टंट स्पर्धा होणार असून यासाठी पुणे येथील खास बॉईज येणार आहेत, तर सुपर बाइक्स एक्सपो शो ही आयोजित करण्यात आला.

यावेळी उद्घाटक मा. मंत्री जयदत्त क्षीरसागर, अध्यक्ष आ. विनायक मेटे, प्रमुख पाहुणे आ. लक्ष्मण पवार हे लाभणार आहे. या स्पर्धेत खेळाडूंनी सहभागी होण्याचे आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. इलियास खान साहेब, इरफान खान (सीएनएस फिटनेस), सचीन टापरे, सय्यद अर्शानउल्ला, मोहन चव्हाण (जळगाव), मनोज गायकवाड (अहमदनगर), अनिल गोरे (धुळे) इतरांनी केले. डॉ. योगेश क्षीरसागर, प्रा. सय्यद मसिह, डॉ. इलियास खान, सय्यद अर्शानउल्ला, बी.बी. जाधव यांची उपस्थिती होती.