१३६ प्रवासी घेऊन निघालेलं बोईंग विमान नदीत कोसळलं 

तालाहासी : वृत्तसंस्था – फ्लोरिडातील जैक्नविलेमधील सेंट नदीमध्ये बोईंग ७३७ विमान कोसळून अपघात झाला आहे. विमानत १३६ प्रवासी होते. ते सर्व सुखरुप असल्याची माहिती जैक्सनविलेच्या महापौरांनी ट्विटरवरून सांगितले आहे. हा क्युबावरून विमान येत असताना त्याला हा अपघात झाला आहे.

बोईंग विमानांना लागलेलं अपघातांचं ग्रहण काही सुटता सुटेना. क्युबावरून बोईंग ७३७ हे विमान येत होतं. त्यावेळी त्याला लॅंडींग करताना ते जैक्सनविल येथील नदीत कोसळलं. दरम्यान विमानात १३६ प्रवासी होते. मात्र विमान पुर्णपणे नदीत बुडालं नसल्याने प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढता आले आहे. अपघातग्रस्त विमानातील १३६ प्रवासी सुखरुप आहेत. असे जैक्नविल विमानतळाच्या प्रवक्त्यासोबत महापौरांनी सांगितलं आहे. दरम्यान विमानातील इंधन नदीत मिसळू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

यापुर्वी १० मार्च रोजी इथियोपियन एअर लाईन्सचे बोईंग ७३७ या विमानाला अपघात झाला होता. या विमानतील १५७ प्रवाशांनी आपला जीव गमावला होता. हे विमान आदिस आबाब येथील केनियाची राजधानी नैरोबी येथे जात होतं.