‘पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना’, कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन – रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा अभिनेत्री कंगना रणौतने संताप व्यक्त केला आहे. तिने पेंग्विन तसंच पप्पू असे उल्लेख करत पुन्हा एकदा शिवसेनेला सोनियासेना म्हटलं आहे.

कंगनाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. “मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वांमी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात?” अशी विचारणा कंगनाने ठाकरे सरकारला केली आहे.

“सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? ही तोंडं वाढतच जाणार आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील,” असं म्हटलं आहे. “पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो. पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना…वडिलांच्या पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना..सोनियासेना म्हटल्यावर राग का येतो?…तुम्ही आहात सोनियासेना,” असंही कंगनाने पुढे म्हटलं आहे.