अभिनेत्री मुमताजच्या मुलीचे बिकीनीतील हॉट आणि बोल्ड फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 60 आणि 70 च्या दशकात मुमताज रसिकांच्या मनावर राज्य करत होती. तिच्या सौंदर्याने लोकांना वेड लावले होते. तिला पडद्यावर पाहून लोक भारावून जात असत. मुमताजबद्दल सर्वजण तर जाणतातच. मुमताजची मुलगी तान्यादेखील तिच्या आईप्रमाणे सुंदर आहे. तान्या वाधवानी खूपच ग्लॅमरस आहे. तान्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तान्याला एक बहिण आहे. तिचं नाव नताशा आहे. अभिनेता फरदीन खानची ती बायको आहे.

तान्याची आई मुमताज लंडनमध्ये वास्तव्यास आहे. मुमताजने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. मुमताजची लहान आणि लाडकी मुलगी तान्या आजकाल खूपच चर्चेत असते. तान्या तिचे हॉट आणि बोल्ड फोटो ती सोशलवर शेअर करत असते. सध्या तिने बिकीनीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

तान्याचे हे हॉट आणि बोल्ड फोटो सध्या सोशलवर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. लोकांना या फोटोंनी वेड लावले आहे. अनेक लोकांनी तिचे फोटो लाईक केले आहे.