‘सौंदर्य’, ‘धन-दौलत’ असताना देखील नगमासह ‘या’ 9 अभिनेत्रींनी केलं नाही लग्न, होते लाखो लोक ‘फिदा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अशा बर्‍याच सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, ज्यांचे चाहते अनेक दशकांपासून आहेत. परंतु, असेही घडते की ज्या अभिनेत्रींचे लाखो करोडो चाहते आहेत, मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्या खूप एकट्या असतात. मोठ्या पडद्यावर जरी रोमान्स करताना दिसत असल्या तरी वैयक्तिक आयुष्यात लग्नापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले आहेत. सुंदरता, संपत्ती असूनही त्यांच्या आयुष्यात जोडीदार नाही. बॉलिवूडमध्ये अश्या बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची अर्धी ओलांडली, परंतु लग्न केले नाही. त्यापैकी एक म्हणजे आशा पारेख.

आशा पारेख :
सुंदर अभिनेत्रींनपैकी एक आशा पारेख १९५९ ते १९७३ दरम्यान त्यांच्या कारकीर्दीत उंचीवर पोहोचल्या. मात्र, तरीही तिने कोणाशीही लग्न केले नाही. खूप सुंदर असूनही, ती आयुष्यात एकाकी राहिली.

अनु अग्रवाल :
बॉलिवूडच्या प्रसिद्ध ‘आशिकी’ ’या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेली अनु अग्रवालनेही कधी लग्न केले नाही.

सुष्मिता सेन :
मिस युनिव्हर्स असलेल्या सुष्मिता सेनने अद्याप लग्न केले नाही. तिचे नाव अनेक सेलिब्रिटींशी जोडले गेले होते, परंतु अद्याप तिने लग्न केलेले नाही. नंतर सुष्मिता सेनने दोन मुली दत्तक घेतल्या. सध्या तिचा एक प्रियकर आहे. पण सुष्मितानेही त्याच्याशी लग्न केले नाही.

तब्बू :
अभिनेत्री तब्बू ही चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालाबरोबर रिलेशनशीप असल्याचे बोलले जाते होते. नंतर काही कारणास्तव हे नातं तुटले. तब्बूनेही अद्याप लग्न केलेले नाही आणि ती सिंगल आहे.

नगमा :
हे नाव चित्रपटसृष्टीतले खूप नामांकित नाव आहे. इतके सुंदर असूनही, नगमाचे अद्याप लग्न झाले नाही. तिचे नाव सौरव गांगुलीशी जोडले जात होते.

अमिषा पटेल :
अभिनेता हृतिक रोशनबरोबर २००० मध्ये अमीषा पटेलने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दिग्दर्शक विक्रम भट्टसोबत तिचे नाते चर्चेत होते. पण हे संबंध फार काळ टिकले नाहीत. अमीषाने अद्याप लग्न केलेले नाही.

– आता या जगात नाहीत या अभिनेत्री, आयुष्यभर राहिल्या एकट्या :
नंदा :
नंदा खूपच सुंदर अभिनेत्री होती, निर्माता मनमोहन देसाईवर तिचे खूप प्रेम होते, पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच दोघांचाही अपघात झाला ज्यात देसाई यांचे निधन झाले. त्यानंतर नंदाने आयुष्यभर लग्न केले नाही.

सुरैय्या :
सुरैयासाठी म्हटले जाते की ती खूप सुंदर होती आणि तिचे देव आनंदबरोबर संबंध होता. वेगवेगळ्या कौटुंबिक वातावरणामुळे या दोघांच्या नात्याला नाव मिळू शकले नाही.

परवीन बॉबी :
७० आणि ८० च्या दशकातील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक होती परवीन बॉबी. त्यांची नावे अनेक सेलिब्रिटींसोबत जोडली गेली होती, अशी अफवा पसरली होती की त्यांचे अमिताभ बच्चनसोबत प्रेमसंबंध आहे. पण त्याने लग्न केले नाही.