Kangana Vs Taapsee War : तापसीनंतर आता स्वरा भास्करचा कंगनावर निशाणा, म्हणाली- ‘1947 मध्ये हिनंच भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं’ !

बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत आणि तापसी पन्नू यांच्या वादात अनेकांनी उडी घेतली आहे. काहींनी कंगनाला सपोर्ट केलाय तर काहींनी तापसी पन्नूला. वीर दास, स्वरा भास्कर, ऋचा चड्ढा यांच्या व्यतिरीक्त सोनाक्षीनं देखील तापसी पन्नूला सपोर्ट करत तिचं कौतुक केलं आहे. एका मुलाखतीत बोलताना कंगना रणौत तापसी पन्नू आणि स्वर भास्करला बी ग्रेड अ‍ॅक्ट्रेस म्हणाली होती. तापसीनं याला उत्तर दिलं होतं आता भास्करनंही कंगनावर पलटवार करत टीका केली आहे.

कंगनाच्या एका मुलाखतीचा काही भाग शेअर करत स्वरानं ट्विट केलंय की, “1955 मध्ये कंगनानं पाथेर पांचाली सोबत पॅरलल सिनेमा चालवला. 2013 मध्ये क्वीन सिनेमाच्या माध्यमातून फेमिनिजम सुरू केलं. या सगळ्याच्या आधी 1947 मध्ये हिनंच भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. कहत एक अज्ञात चापलूस जरूरतमंद आउटसाईडर, चापलूसी का फल (आम) खाते और उंगलियां चाटते हुए.” तापसी पन्नूनंही हे ट्विट रिट्विट केलं आहे.

काय म्हणाली कंगना ?

स्वरानं शेअर केलेल्या व्हिडीओत कंगना म्हणत आहे की, “चापलूस आउटसाईडर्स खूप जास्त आहेत. मी त्यांना पहात असते. तापसनी पन्नूसारखी लोक जे म्हणतात की, आम्हाला खूप प्रेम मिळालं आहे. चापलूस लोकांच्या दुनियेत काहीच प्रॉब्लेम नाहीये.”