Kangana Ranaut च्या विरूद्ध मुंबईत आणखी एक FIR दाखल, यावेळी न्यायालयाच्या अवमानाचा आरोप

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावतच्या विरूद्ध मुंबईत आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यावेळी प्रकरण न्यायालयाच्य अवमानाशी संबंधीत आहे. पोलीस रिपोर्ट दाखल करणार्‍या अधिवक्त्याने कंगनावर आरोप केला आहे की, तिने न्यायालयाबाबत दुर्दैवी ट्विट केले होते.

स्थानिक न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी मुंबई पोलीस एका अन्य प्रकरणात दाखल गुन्ह्याच्या आधारे कंगना आणि तिची बहिण रंगोली चंदेल यांना पुढील आठवड्यात हजर होण्यासाठी समन्स पाठवण्यात आले आहे. हा गुन्हा एका अन्य तक्रारीच्या आधारे बांद्रा मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटच्या आदेशावर दाखल करण्यात आला होता.

पीटीआयनुसार, अधिवक्ता अली काशिफ खान देशमुख यांनी अंधेरी मजिस्टेट कोर्टमध्ये तक्रार केली आहे की, कंगना आपल्या ट्विटद्वारे दोन समाजांमध्ये द्वेष आणि शत्रूत्व पसरवत आहे. तिच्यावर देशद्रोहाचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, बॉलीवुड अभिनेत्री मनात विविध समाज, कायदा आणि सरकारी संस्थासाठी सन्मान नाही. एवढेच नव्हे तर तिने न्यायालयाचीही थट्टा केली आहे.

बांद्रा कोर्टाच्या आदेशावर अभिनेत्रीच्या विरूद्ध दुर्दैवी आणि अवमानकारक ट्विट करण्याची तक्रार नोंदवली आहे. प्रकरणाची सुनावणी 10 नोव्हेंबरला अंधेरी कोर्टात होणार आहे. मागच्या आठवड्यात बांद्रा मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने पोलिसांना मुनव्वर अली सईद यांच्या तक्रारीवर तपास करण्याचे निर्देश दिले होते. मुनव्वर बॉलीवुडमध्ये कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर आहे. या तक्रारीत कंगना आणि रंगोलीच्या ट्विट आणि वक्तव्याचा संदर्भ देण्यात आला होता.

न्यायालयाच्या निर्देशानंतर बांद्रा पोलिसांनी दोघींच्याविरूद्ध भादवि कलम 153ए, 295ए आणि 124ए अंतर्गत तक्रार दाखल केली होती. कंगनाने पोलिसांच्या समन्सवर प्रतिक्रिया देताना ट्विट केले होते की, विक्षिप्त पेंग्वींन सेना… पप्पू-प्रो महाराष्ट्र … खुप आठवण येते के के के के कंगना…. काही हरकत नाही, लवकरच येईन.

You might also like