‘बाहुबली’ नव्हे, टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटरसोबत ‘देवसेना’ करणार लग्न, अनुष्का शेट्टीचं जडलं ‘नॉर्थ इंडियन’वर प्रेम

हैदराबाद : वृत्तसंस्था – साउथ इंडियन फिल्म बाहुबलीमुळे संपूर्ण देशात प्रसिद्ध झालेली दक्षिण भारतीय अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही पुन्हा एकदा विवाहाच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. अनेक मीडिया रिपोटर्सनी दावा केला आहे की, बाहुबलीच्या देवसेनाचे इंडियन क्रिकेट टीमच्या एका क्रिकेटरवर प्रेम जडले आहे. दोघे एकमेकांना डेट करत आहेत. एवढेच नव्हे तर दोघे लवकरच लग्नही करणार आहेत.

अनुष्का शेट्टीच्या अफेयरच्या बातमीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंडियन क्रिकेट टीमच्या ज्या प्लेयरशी तिचे प्रेम जुळले आहे तो साउथ इंडियाचा नसून अनुष्का शेट्टी उत्तर भारतातील एका क्रिकेटरसोबत विविहबद्ध होणार आहे.

बाहुबलीनंतर लागोपाठ अशा बातम्या पसरत होत्या की, अनुष्का शेट्टी आणि प्रभास एकमेकांना डेट करत आहेत. तसेच दोघे लग्न करणार आहेत. परंतु, साहोच्या प्रचारादरम्यान जेव्हा प्रभास करण जोहरचा शो कॉफी विथ करण मध्ये आला होता तेव्हा त्याने ही गोष्ट पूर्णपणे नाकारली होती.

यानंतर स्पष्ट झाले की प्रभास आणि अनुष्कामध्ये काहीही नाही. बाहुबलीपूर्वी सुद्धा अनुष्का आणि प्रभासची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. परंतु, दोघांनी आपसातील संमतीने एकमेकांना डेट करण्याचा निर्णय घेतला होता.

सध्या बाहुबली प्रभासबाबात कोणतेही वृत्त नाही की, तो सध्या सिंगल आहे की त्याने नवीन आयुष्य सुरू केले आहे. मात्र, अनुष्काबाबत वृत्त असून ती एका इंडियन क्रिकेटरला डेट करत आहे. मात्र अजून या क्रिकेटरचे नाव समोर आलेले नाही. वर्कफ्रंटनुसार अनुष्का शेट्टी सध्या माधवनसोबतच्या निशब्दम चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.