आमिर खानच्या मुलीचा BOLD फोटो सोशलवर ‘व्हायरल’, अभिनेत्रींना देखील टाकलं मागं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान याच्या मुलीने देखील बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. इरा खान असे त्याच्या मुलीचे नाव आहे. मात्र त्याच्या मुलीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले नसून तिने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सध्या ती एका मालिकेचे दिग्दर्शन करत आहे. त्याचबरोबर ती मॉडेलिंग देखील करत आहे. तसेच ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह  असते. इंस्टाग्राम अकाउंटवर आपले अनेक फोटो ती अपलोड करत असते. या फोटोंमध्ये ती जास्तच बोल्ड दिसून येत असून अनेक अभिनेत्रींना मात देत आहे.

या फोटोत ती डार्क मेकअपसह लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे. तिने इंस्टाग्राम अकाउंटवर आपला एक फोटो अपलोड करताना लिहिले आहे कि, ‘सॅटर्डे  नाईट वाईब’. तिला अभिनयात रस  नसून तिला दिग्दर्शनात करियर करायचे आहे. याआधी देखील तिने अनेक वेळा विविध फोटो अपलोड केले आहेत.  सध्या इरा ज्या नाटकाचे दिगदर्शन करत आहे, ते  ग्रीक त्रासदी आणि पौराणिक कथांवर आधारित आहे. यूरिपिड्स मेडिया असे या नाटकाचे नाव असून यामध्ये भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंह याची पत्नी  हेजल कीच मुख्य भूमिका साकारत आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिने याबाबतची घोषणा केली. तसेच या फोटोमध्ये लिहिले आहे कि, मी तुझ्यासोबत काम करण्यासाठी फार उत्सुक असून, आपल्या कामासाठी देखील मी फारच उत्साहित आहे.

Visit : Policenama.com