Bunty Aur Babli 2 चा ट्रेलर रिलीज, सैफ आणि राणी मुखर्जी करणार मोठा ‘धमाका’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 2005 साली आलेला बॉकबस्टर सिनेमा बंटी और बबली या सिनेमाच्या सिक्वलची सध्या जोरादार चर्चा सुरू होती. फायनली बंटी और बबली 2 सिनेमाचा टीजर समोर आला आहे. सिनेमाची पूर्ण स्टार कास्ट आणि रिलीज डेटही समोर आली आहे. बॉलिवूडमध्ये पसंत केली जाणारी जोडी दीर्घकाळानंतर या सिनेमाच्या निमित्तानं पडद्यावर दिसणार आहे. ही जोडी आहे सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांची.

राणी, सैफ यांच्या व्यतिरीक्त या सिनेमात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अ‍ॅक्ट्रेस शारवरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. वरूण व्ही शर्मा सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. यश राज फिल्म या सिनेमाची निर्मिती करत आहे. टीजरमध्ये बंटी आणि बबली यांच्या भूमिकांसाठी सैफ आणि राणी यांचं इंट्रोडक्शन करून दिल्याचं दिसत आहे. सैफ आणि राणीची जोडी हम तुम आणि ता रा रम पम सिनेमात दिसली होती. हे सुपरहिट सिनेमे होते.

26 जून 2020 रोजी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. सध्या सिनेमाची शुटींग सुरू आहे. अबू धाबीमध्ये सिनेमाचं पहिलं शेड्युल शुट करण्यास सुरुवात झाली आहे. 2005 साली आलेल्या बंटी और बबली सिनेमात अभिषेक बच्चन दिसला होता. अमिताभ बच्चननंही सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता 15 वर्षांनंतर सिनेमाचे मेकर्स काय नवीन घेऊन आले आहेत हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर राणी मुखर्जी नुकतीच ती मर्दानी 2 सिनेमात दिसली होती. तर सैफ अली खानही तान्हाजी सिनेमानंतर जवानी जानेमनमध्ये दिसला होता.

You might also like